उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील फरार आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखाचं बक्षीस! फरार आरोपीचं NIAने नावंही सांगितलं
Umesh Kolhe Murder Case Latest News : अमरावती जिल्ह्यामध्ये 22 जून रोजी 50 वर्षीय मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. घराजवळच गळा चिरुन उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. या हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अमरावती : उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील (Umesh Kolhe Murder case) फरार आरोपीबाबत माहिती मिळवण्यासाठी आता एनआयएकडून (NIA) मोठी घोषणा करण्यात आली आहे. फरार आरोपीची माहिती देणाऱ्याला तब्बल 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. शाहिद अहमद हा उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपी असून तो फरार आहे. फरार शाहिद अहमदबाबत (Shahid Ahmed) जो माहिती देईल, त्याला 2 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल, असं एनआयएकडून सांगण्यात आलं.
उमेश कोल्हे हत्याप्रकरणी आतापर्यंत सातपेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता फरार शाहिद अहमद याचाही कसून तपास केला जातोय. मात्र एनआयएनेकडून शाहिदचा शोध घेण्यासाठी आता 2 लाख रुपयांचा कॅश रिवॉर्डही जाहीर करण्यात आला आहे.
पाहा LIVE घडामोडी : Video
काय आहे उमेश कोल्हे हत्याप्रकरण?
अमरावती जिल्ह्यामध्ये 22 जून रोजी 50 वर्षीय मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. घराजवळच गळा चिरुन उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. या हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर हत्याकांड उघडकीस आल्यापासून आठवा आरोपी शाहिद अहमद फरार आहे. पोलीसही त्याच्या मागावर असून आता त्याच्या शोधासाठी एनआयएने मोठी घोषणा केली आहे. शाहीदची माहिती देण्यासाठी 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलाय.
कुणीकुणाला अटक?
उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने सात आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं होतं. यात मुदस्सर अहमद (22), शाहरुख पठान (25), अब्दुल तौफिक (24), शोएब खान (22), आतिब रशीद (22) आणि डॉ. यूसुफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश होता. तसंत प्रमुख आरोपी शेख इरफान शेख रहिमलाही ताब्यात घेतलं होतं.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त पोस्टला समर्थन दिल्याप्रकरणावरुन उमेश कोल्हे यांनी हत्या करण्यात आली असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, हे प्रकरण संवेदनशीन असल्याकारणाने या हत्याकांडप्रकरणाचं गूढ वाढलंय. आता आठव्या आरोपीचा नेमका सुगावा केव्हा लागतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.