अमरावतीमध्ये भीषण अपघात! 3 जण जागीच ठार, नेमका कसा घडला अपघात?

| Updated on: Nov 11, 2022 | 12:32 PM

राज्यात रस्ते अपघातांचं प्रश्न पुन्हा ऐरणीवर! अमरावतीच्या वरुड तालुक्यात तिघांवर काळाचा घाला

अमरावतीमध्ये भीषण अपघात! 3 जण जागीच ठार, नेमका कसा घडला अपघात?
भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अमरावती : अमरावती जिल्ह्यात एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक (Amravati Accident News) दिली. या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. इतकंच नव्हे तर दुचाकीवरील तिघा जणांचा जागच्या जागीच जीव (Bike accident) गेलाय. हा भीषण अपघात अमरावती जिल्ह्यातील वरड तालुक्यात घडला. या अपघातप्रकरणी पोलिसांकडून (Amravati crime news) आता तपास केला जातो आहे. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नेमकी कुणी या दुचाकीला धडक दिली, याचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरड तालुक्यात तीन रहिवासी दुचाकीवरुन जात होते. दुचाकीवरुन जात असतेवेळी पंढरी येथे एक भरधाव वाहन काळ बनून आलं. या दुर्दैवी अपघातात झालेल्या तिघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते आहे.

वरड तालुक्यातील अमडापूर इथं राहणारे तीन युवक दुचाकीने रोजगारासाठी जात होते. किसन शिवनाथ लांगापुरे, वय 45, मनोहर रामराव लांगापुरे, वय 40 आणि राजेश रामदार शिंदे, वय 40 अशी तिघा मृत तरुणांची नावे आहेत.

सकाळी सात-सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घडना घडली. या अपघाताची तीव्रता इतकी जबर होती की तिघांचेही मृतदेह रस्त्याच्या कडेला पडले होते. यातील दोघेजण दूरवर फेसले गेले होते. तर एक तरण चक्कचूर झालेल्या दुचाकीच्या शेजारीच जखमी अवस्थेत पडला होता. नेमका हा अपघात घडला कसा, याबाबतही सखोल तपास केला जातोय.

तिघा तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या अपघातप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातोय. कामाच्या शोधात दुचाकीवरुन जायला निघालेल्या तिघा तरुणांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय.