Nagpur Court : नागपुरात 11 वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले, नराधमाला न्यायालयाने सुनावली जन्मपेठेची शिक्षा, काय आहे प्रकरण?

तिच्यासोबत अतिप्रसंग झाल्याचे लक्षात आले. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. 20 ऑक्टोबरला आतीश यादवला अटक करण्यात आली.

Nagpur Court : नागपुरात 11 वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले, नराधमाला न्यायालयाने सुनावली जन्मपेठेची शिक्षा, काय आहे प्रकरण?
गर्भलिंग तपासणी आणि निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 8:01 PM

नागपूर : आरोपीला शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याची ओरड आहे. पण, नागपुरातल्या एका घटनेत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावण्यात आली. एका अल्पवयीन मुलीवर त्याने बलात्कार केला होता. 32 वर्षीय नराधमाच्या कन्हान पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आता न्यायालयानंही त्याला दोषी ठरविलं. जन्मभर खडी फोडण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. 19 ऑक्टोबर 2018 ची दीड ते दोनच्या दरम्यानची वेळ. 11 वर्षीय मुलगी खेळत होती. कन्हानजवळील गोंडेगावचा आतीश दिनेश यादव (Atish Yadav) याने तिला उचलून नेले. मुलगी घरी दिसली नसल्यानं या घटनेची तक्रार कन्हान पोलिसांत (Kanhan Police) करण्यात आली. कन्हान पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. गोंडेगाव जवळील नाल्याच्या बाजूला बेशुद्धावस्थेत सापडली. तिच्यासोबत अतिप्रसंग झाल्याचे लक्षात आले. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. 20 ऑक्टोबरला आतीश यादवला अटक करण्यात आली.

आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक काळे यांनी केला. प्रकरण नागपूर येथील न्यायाधीश आर. पी. पांडे यांच्या कोर्टात गेले. न्यायालयाने साक्षी तपासल्या. त्यानंतर आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. वेगवेगळ्या कलमान्वये वेगवेगळी शिक्षा सुनावली. त्यानुसार कलम 307 अन्वये आजीवन कारावास व पाच हजार रुपये दंड. दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. कलम 376 अन्वये आजीवन कारावास व पाच हजार रुपये दंड. दड न भरल्यास आणखी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

यांनी पाहिले काम

सरकारच्या वतीनं एपीपी पळसोडकर यांनी काम पाहिले. तपास अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी वाझे, पोलीस उपनिरीक्षक भवानीप्रसाद मिश्रा, सहायक फौजदार सुनील डोंगरे, पोलीस हवालदार मनोज तिवारी, प्रकाश वर्मा, अहमद सैफतुल्ला यांनी सहकार्य केले. क्षणीक मोहाला काही युवक बळी पडतात. अत्याचारापर्यंत त्यांची मजल जाते. अशावेळी अख्ख आयुष्य कैदेत जाते. याचं हे उदाहरण आहे.

हे सुद्धा वाचा

पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.