Nagpur Crime : काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर जेलमधून बाहेर आला, अन् भाच्यासोबत झालेल्या वादाचा काटा काढला

नवीन वर्षात नागपूर शहरात हत्यासत्र सुरू झालं ते थांबताना दिसत नाही. काल रात्री पुन्हा एका हत्येच्या घटनेने खळबळ माजली आहे. पार्वती नगर परिसरात राहणारा विकी चंदेल याचा आरोपीच्या भाच्यासोबत वाद झाला होता.

Nagpur Crime : काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर जेलमधून बाहेर आला, अन् भाच्यासोबत झालेल्या वादाचा काटा काढला
नागपूरमध्ये जुन्या वादातून तरुणाला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 3:22 PM

नागूपर : काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर जेलमधून बाहेर आलेल्या आरोपीने पुन्हा एकाची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. यावरुन नागपुरात हत्या सत्र थांबायचं नाव घेताना दिसत नाही. नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन हद्दीत पार्वती नगर परिसरात पॅरोलवर जेलमधून बाहेर आलेल्या एका आरोपीने युवकाची हत्या केली. विकी चंदेल असे हत्या करणाऱ्या आलेल्या तरुणाचे नाव आहे. भाच्यासोबत झालेल्या जुन्या वादातून आरोपीने ही हत्या केल्याचं पुढे येत आहे. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.

भाच्यासोबत झालेल्या वादाचा मामाने घेतला बदला

नवीन वर्षात नागपूर शहरात हत्यासत्र सुरू झालं ते थांबताना दिसत नाही. काल रात्री पुन्हा एका हत्येच्या घटनेने खळबळ माजली आहे. पार्वती नगर परिसरात राहणारा विकी चंदेल याचा आरोपीच्या भाच्यासोबत वाद झाला होता. या वादातूनच ही हत्या झाली असल्याचं पुढे येत आहे.

आरोपी पॅरोलवर आला होता बाहेर

महत्त्वाचं म्हणजे यातील आरोपी हा हत्येच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता आणि काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला होता. पेरोलवर बाहेर आल्यानंतर सुद्धा तो गप्प बसला नाही आणि त्याने पुन्हा हत्या केल्याचं समोर आलं.

हे सुद्धा वाचा

हत्या केल्यानंतर आरोपी फरार

चार ते पाच जणांनी मिळून ही हत्या केली असल्याची माहिती मिळते. तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, हत्या प्रकरणी आधीच तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतरही आरोपी सुधारला नाही. उलट पॅरोलवर सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा एक हत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....