Nagpur Crime | गुलाम अशरफीविरोधात आणखी फसवणुकीचा गुन्हा, नागपुरात राष्ट्रवादीचा पदाधिकारी अडचणीत

गुलाम अशरफी हा अनेकांना वाहन फायनन्स करण्यासाठी मदत करायचा. त्यानंतर त्या ग्राहकाला इन्स्टालमेंट भरण्यास मज्जाव करायचा. मी सगळं पाहतो सेटलमेंट करतो असं सांगायचा. जेव्हा कंपनी वाहन सिज करायला यायची तेव्हा हा त्यांना धमकवायचा. स्वस्तात त्या गाड्यांच्या लिलाव करायला सांगत असे.

Nagpur Crime | गुलाम अशरफीविरोधात आणखी फसवणुकीचा गुन्हा, नागपुरात राष्ट्रवादीचा पदाधिकारी अडचणीत
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 1:44 PM

नागपूर : काही दिवसांपूर्वी गुलाम अशरफीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गुलाम अशरफी याच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र बँक ला 1 कोटी तर इतर 99 लाख रुपयांची फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याला एक जून रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी इतर कोणाची फसवणूक झाली असल्यास पुढे येण्याचं आवाहन केलं. त्यानुसार आता अनेक जण पुढे येत आहेत. आता एका वाहन फायनान्स (Vehicle Finance) कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. यात सुद्धा जवळपास 3 कोटी रुपयांची फसवणूक असल्याचं समोर येत आहे. अशी माहिती पाचपावली पोलीस ( Pachpavli Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे (sanjay Mendhe) यांनी दिली.

कशी करायचा फसवणूक

गुलाम अशरफी हा अनेकांना वाहन फायनन्स करण्यासाठी मदत करायचा. त्यानंतर त्या ग्राहकाला इन्स्टालमेंट भरण्यास मज्जाव करायचा. मी सगळं पाहतो सेटलमेंट करतो असं सांगायचा. जेव्हा कंपनी वाहन सिज करायला यायची तेव्हा हा त्यांना धमकवायचा. स्वस्तात त्या गाड्यांच्या लिलाव करायला सांगत असे. त्या गाड्या स्वस्तात तो खरेदी करायचा. मात्र आता याचा घडा भरला. पोलिसांनी त्याला चांगलंच घेरलं आहे. यात आणखी किती गुन्हे दाखल होणार हे पुढच्या काळात समोर येईल.

गुलाम अशरफीच्या अडचणी वाढणार

नागपुरातील गुलाम अशरफी याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. त्याच्यावर आता पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्याच्यासोबत आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. काही गुंड गुन्हे दाबण्यासाठी राजकीय पक्षात प्रवेश करतात. तसाच प्रकार गुलाम अशरफीच्या बाबतीत झाल्याचं समजतं. गुन्हे दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यानं राजकारणात प्रवेश केला. येत्या मनपाच्या निवडणुकीवर त्याचं लक्ष होतं. पण, आता त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे. गुलाम अशरफीनं बँकेतून कर्ज काढण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केली. नोकरीवर असल्याच्या खोट्या स्लीप बनवल्या. बँकेची फसवणूक केली. दुसऱ्यांनाही कर्ज काढून देण्यास मदत करायचा. त्यांचे हफ्ते चुकवायला लावायचा.

हे सुद्धा वाचा

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.