Nagpur Crime | हे पाप कुणाचं? नागपुरात मतिमंद मुलीवर अत्याचार; जरीपटका पोलिसांत गुन्हा दाखल
ती मुलगी बऱ्याच ठिकाणी फिरली. त्यामुळं तिच्यावर अत्याचार कुणी केला, हे सांगता येणार नाही. पण, रेल्वेस्टेशन परिसरातील ऑटोवाला व्यक्ती असल्याची माहिती मतिमंद मुलीनं आपल्या आईला दिली. त्यावरून तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नागपूर : मतिमंद मुलगी ही चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. ती घर सोडून 18 मे 2020 नागपुरात आली. मात्र ती भटकत होती. तिला काही समजत नव्हतं. मात्र 5 मे रोजी ती जरीपटका पोलीस (Jaripatka Police) स्टेशन हद्दीत एका महिलेला भेटली. त्या महिलेने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्या मुलीला सुधारगृहात पाठविलं. सुधार गृहाने त्या मुलीच्या पालकांचा शोध घेत त्यांच्या स्वाधीन केलं. मात्र जेव्हा मुलगी घरी गेली तेव्हा घरच्यांना संशय आला. त्यांनी तिला रुग्णालयात (Hospital) नेलं असता ती गरोदर असल्याचं समोर आलं. यावरून तिच्या घरच्यांनी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. अशी माहिती पोलीस निरीक्षक गोरख कुंभार (Police Inspector Gorakh Kumbhar) यांनी दिली.
रेल्वेस्थानक परिसरात होती
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत एका मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या मुलीवर अत्याचार कोणी केला हे तिला सांगता येत नाही. मात्र ती अनेक दिवस रेल्वे स्थानक परिसरात राहिली असल्याने पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं
18 मे रोजी पीडित मुलीच्या तक्रार दिली. त्यानुसार, मतिमंद पीडित मुलगी मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. 25 फेब्रुवारी 2020 रोजी चंद्रपुरातून घरून ती निघाली. 4 मे रोजी 2020 जरीपटका पोलिसांना सापडली. जरीपटका पोलिसांनी तिला जीवन केअर सेंटर येथे सुधारगृहात केले. सुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी तिच्या नातेवाईकांना माहिती दिली. कुटुंबीय आले मुलीला घेऊन गेले. तेव्हा ती गरोदर असल्याचं दिसून आलं. त्यावरून जरीपटका पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला. 25 फेब्रुवारी 20 पासून घरून निघाली. तेव्हापासून ती मुलगी बऱ्याच ठिकाणी फिरली. त्यामुळं तिच्यावर अत्याचार कुणी केला, हे सांगता येणार नाही. पण, रेल्वेस्टेशन परिसरातील ऑटोवाला व्यक्ती असल्याची माहिती मतिमंद मुलीनं आपल्या आईला दिली. त्यावरून तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.