Bhandara : प्रेमसंबंधांतून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती! तरुणावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव दिनेश अंताराम शेंद्रे आहे. हा तरुण 27 वर्षांचा आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिनेशने लग्नाचं आमीष दाखवलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं, असा आरोप त्याच्यावर आहे.
भंडारा : दिनेशचं एका मुलीवर प्रेम होतं. त्याची प्रेयसी अल्पवयीन (Minor girl friend) होती. वय अवघं 17 वर्ष. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. त्यातून मुलगी गर्भवती (Pregnant) राहिली. दिनेश लग्नासाठी तयार होता. त्याने लग्नासाठी गावातील लोकांची अधिकृत परवानगी मागितली. पण मुलगी अल्पवयीन असल्यामुळे ते शक्य नव्हतं. अखेर दिनेशविरोधात पोलिसांत (Bhandara crime News) गावातील लोकांनीच सांगितलं. सहा महिन्यांपासून तो अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमीष दाखवून लैंगिक शोषण करतोय, अशी तक्रार देण्यात आली. पोलिसांनीही याप्रकरणी दिनेशवर गुन्हा नोंदवून घेतला. भंडारा जिल्ह्यातील एका गावात घडलेल्या या घटनेनं पीडितेचे पालकही धास्तावलेत. तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजलीय. याप्रकरणी सध्या पोलिसांकडूनही अधिक तपास केला जातोय.
तरुणावर गुन्हा
गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव दिनेश अंताराम शेंद्रे आहे. हा तरुण 27 वर्षांचा आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिनेशने लग्नाचं आमीष दाखवलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं, असा आरोप त्याच्यावर आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार 27 वर्षीय दिनेशवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय. पुढील चौकशी केली जातेय.
प्रेमसंबंधातून गर्भवती, पण…
आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलगीसोबत दिनेशने प्रेमसंबंध ठेवले. गेल्या सहा महिन्यांपासून दिनेश या मुलीचं लैंगिक शोषण करत होता, असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, पीडित मुलगी गर्भवती राहिल्यामुळे दिनेशने स्थानिक तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष यांची भेट घेतली आणि दोघांचं समितीच्या वतीने लग्न लावून द्यावं, अशी मागणी केली. मात्र तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं कारण देत त्यांनी लग्न लावून देण्यास नकार दिला.
अखेर या प्रकरणाची माहिती झाल्यानंतर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी घडलेला प्रकार पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पोलीस पाटील यांनादेखील याबाबत कळवण्यात आलं.अखेरीस या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तक्रार दाखल करुन घेत गुन्हा नोंदवून घेतला आहे. संशयित आरोपी दिनेश विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर लाखनी पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय.