Bhandara Drowned : अजून घरी का आली नाही म्हणून शोधाशोध, विहिरीपाशी जे दिसलं, त्याने आईच्या काळजाचे तुकडे!

सलोनी दहावीत होती, विहिरीबाहेर सलोनीच्या चपला दिसल्या, आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली...

Bhandara Drowned : अजून घरी का आली नाही म्हणून शोधाशोध, विहिरीपाशी जे दिसलं, त्याने आईच्या काळजाचे तुकडे!
दहावीतील विद्यार्थीनीचा दुर्दैवी अंतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 10:00 AM

भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील पवनी (Pawani, Bhandara) तालुक्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. बराच वेळ दहावीतील शिकणारी घरातली मुलगी परतली नाही म्हणून आईने शोधाशोध करायला सुरुवात केली. एका विहिरीपाशी आईला मुलीच्या चपला आढळून आल्या. त्यामुळे आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अखेर विहिरीकडे जाऊन पाहिलंही. पण विहिरीच्या पाण्यात मुलगी दिसली नाही. दरम्यान, गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असताना मुलगी विहिरीच्या पाण्यात बुडाल्याचं (Bhandara Drowned death) उघडकीस आलं. दहावीतील विद्यार्थीनीच्या मृत्यूने आता संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जातेय.

शेळ्यांसाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या दहावीतील विद्यार्थिनीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील चिचाळ येथे घडली. सलोनी विनोद नखाते (16) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जातेय. या विद्यार्थीनीवर शोकाकुल वातावरणात चिचाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सलोनी ही चिचाळ येथील जिल्हा परिषद विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होती. विनोद नखाते पत्नी संगीतासोबत बटईने केलेल्या शेतावर शेळ्या घेऊन गेले होते. तर सलोनी सकाळची शाळा आटोपून आईवडील असलेल्या शेतात गेली.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी आईने तिला शेळ्यांसाठी पाणी आणण्यासाठी शेताच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या विहिरीवर पाठविले. विहिरीतून बादलीने पाणी काढताना सलोनीचा पाय घसला आणि ती विहिरीत पडली.

मुलगी अद्याप का आली नाही म्हणून आईने विहिरीकडे जाऊन बघितले. तेव्हा विहिरीच्या काठावर सलोनीच्या चपला दिसल्या. मुलगी विहिरीत पडल्याचे लक्षात येताच आईने आरडाओरड सुरू केला. वडीलही विहिरीकडे धावले.

विहिरीत बघितले असता सलोनी दिसली नाही. दरम्यान, गावकऱ्यांनीही शेताकडे धाव घेतली. घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली असता ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत शोध घेण्यात आला. त्यानंतर सलोनीचा मृतदेह विहिरतून बाहेर काढण्यात आला.

यावेळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. सलोनीचा मृतदेह अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी पाठविन्यात आला असून अड्याळ पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली आहे. दहावीतील मुलीच्या मृत्यूने सलोनीच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.