इन्स्टाग्रामवर मुलांना अनफॉलो करण्यास प्रेयसीचा नकार, निराश प्रियकराने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

| Updated on: Sep 28, 2022 | 3:08 PM

रोहनची प्रेयसी सोशल मीडिया साईट इन्साग्रामवर अॅक्टिव्ह होती. इन्टाग्रामवर ती काही पुरुषांना फॉलो करत होती.

इन्स्टाग्रामवर मुलांना अनफॉलो करण्यास प्रेयसीचा नकार, निराश प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल
सायबर क्राईमचा नवा गुन्हा उघडकीस
Follow us on

मुंबई : प्रेयसीने तिच्या इन्टाग्राम (Instagram)वर अकाऊंटवर मुलांना अनफॉलो (Unfollow) करण्यास नकार दिल्याने नैराश्येतून 22 वर्षीय तरुणाने स्वतःचे जीव संपवल्याची (Killed Himself) धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रोहन सिंह कपूर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

प्रेयसी इन्स्टाग्रामवर पुरुषांना फॉलो करायची

रोहनची प्रेयसी सोशल मीडिया साईट इन्साग्रामवर अॅक्टिव्ह होती. इन्टाग्रामवर ती काही पुरुषांना फॉलो करत होती. यावरुन रोहनमध्ये आणि तरुणीमध्ये वारंवार वाद होत होते. रोहन तरुणीला इन्स्टाग्रामवर पुरुषांना अनफॉलो करायला सांगत होता. मात्र तरुणी ऐकत नव्हती.

रोहन कर्जबाजारीपणामुळेही नैराश्येत होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहनच्या डोक्यावर खूप कर्ज होते. या कारणामुळेही तो नैराश्येत राहत होता. यामुळे त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्याने तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला आपल्या भावाला याची माहिती देण्यास सांगितली.

हे सुद्धा वाचा

उपचारादरम्यान रोहना मृत्यू

सदर व्यक्तीने रोहनचा भाऊ वीरपाल सिंग कपूरला फोन करुन या घटनेची माहिती दिली. वीरपालने तात्काळ घटनास्थळी दाखल होत रोहन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सीताबर्डी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी तरुणाची प्रेयसी आणि कुटुंबीयांचीही चौकशी करत आहे.