Video : ‘ही नको, ती दाखवा’ असं सांगून बुलडाण्यात महिलांनी चोरली सोन्याची पोत! सीसीटीव्ही पाहून दुकानदारही हैराण

Buldana Crime News : मंगळवारी सव्वा अकरा साडे अकरा वाजण्याच्या सुमारात चोरीची ही घटना घडली. या दरम्यान, एक महिला दागिने घालून आरशात पाहतेही

Video : 'ही नको, ती दाखवा' असं सांगून बुलडाण्यात महिलांनी चोरली सोन्याची पोत! सीसीटीव्ही पाहून दुकानदारही हैराण
चोरी सीसीटीव्ही कैद...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 10:57 AM

बुलडाणा : सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातून चोरी (Buldana Crime) करणारी एक महिला सीसीटीव्ही (Buldana CCTV Video) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुकानदाराच्या समोरुन सोन्याची पोत लांबवणाऱ्या महिलेची हातचलाखी कुणाच्याच नजरेत आली नाही. मात्र सीसीटीव्हीने या महिलेचा बरोबर पकडलं. अखेर या चोरट्या महिलेची ओळख पटली असून आता तिचा शोध घेणं सुरु आहे. पोलिसांनी (Buldana Police) याप्रकरणी दोघा अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढीत तपास आता केला जातो आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील सराफा दुकाना 22 ग्रॅम सोन्याची पोत चोरण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. अखेर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर खरेदीच्या बहाण्याने दुकाना शिरलेल्या दोघींपैकी एकीने विक्रेत्यांना गंडवून सोन्याची पोत लांबवली असल्याच स्पष्ट झालं आहे.

मेहकर शहरात सराफा दुकानांमध्ये चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढलंय. महिलांकडून सातत्यानंतर सराफा विक्रेत्यांच्या डोळ्यात धूळ फेकून चोऱ्या केल्या जात असल्याचे प्रकार समोर आले होते. अखेर चोऱ्या करणाऱ्या दोघा महिलांना सीसीटीव्हीच्या नजरेनं कैद केलं असून आता या महिलांना अटक करण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आहे.

..अशी केली चोरी!

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील राजेश उमाळकर यांचे मालकीचे रेणुका ज्वेलर्स दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान उघडले असता दोन महिला दुकानात सोन्याची पोत घेण्यासाठी आल्या. दुकानातील कामगारांना त्यांनी पोत दाखवण्यास सांगितली असता एक महिला कामगारांना पोत दाखवण्यास गुंतवते, तर दुसरी महीला एक लाख पंधरा हजारांची पोत हातात घेऊन मागील पिशवीत टाकते आणि चोरी करते. ही चोरी दोघा विक्रेत्यांच्या समोरच केली जाते.

हे सुद्धा वाचा

मंगळवारी सव्वा अकरा साडे अकरा वाजण्याच्या सुमारात चोरीची ही घटना घडली. या दरम्यान, एक महिला दागिने घालून आरशात पाहतेही. त्यानंतर इतर काही दागिने दाखवण्यासही सांगितलं जातं. तर दोघे विक्रेत दुकानात महिलांना दागदागिने दाखवत असतात. त्या दरम्यान, दोघींपैकी एक महिला हातचलाखीने चोरी करते.

पाहा व्हिडीओ :

कळलं कसं?

ज्यावेळी दुकानदार राजेश उमाळकार हे त्यांच्या दुकानातील स्टॉक तपासणी करतात, तेव्हा चोरीचा प्रकार लक्षात येतो. ज्वेलर्स मालकाकडून यानंतर सीसीटीव्ही फुटजेची तपासणी केली होती. त्यामधे महिला एक लाख पंधरा हजर रुपयांची पोत चोरताना दिसते. यासंदर्भात पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.