बायकोला मतदान करतानाचा फोटो WhatsApp स्टेटसवर, बुलडाण्यातील नवऱ्यावर गुन्हा

मतदान करतानाचे फोटो उमेदवार महिलेच्या पतीने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवले होते. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बायकोला मतदान करतानाचा फोटो WhatsApp स्टेटसवर, बुलडाण्यातील नवऱ्यावर गुन्हा
पत्नीला मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअॅपवर स्टेटस
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 12:23 PM

बुलडाणा : मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवणाऱ्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गोपनीयता भंग केल्याप्रकरणी उमेदवार महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात बोराखेडी पोलिसांनी ही कारवाई केली.

काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीदरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात हा प्रकार घडला होता. मतदान करतानाचे फोटो उमेदवार महिलेच्या पतीने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवले होते. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगर पंचायतीसाठी 21 डिसेंबरला मतदान पार पडले. मतदानाच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवार वृषाली पाटील यांचे पती आणि आरोपी प्रवीण शेळके पाटील याने पत्नीला मतदान करण्यासाठी त्यांच्या नावासमोर असलेल्या चिन्हावर बोट ठेऊन मतदान करतानाचा फोटो काढत आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला होता.

गोपनीयतेचा भंग आणि मतदारांना प्रभावित केल्याचा ठपका ठेवत आरोपी प्रवीण शेळके याच्यावर बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

रेणुका शिंदे-सीमा गावितला फाशीच हवी, राज्य सरकार ठाम, आजन्म कारावासाविषयीचं वक्तव्य मागे

पुण्यात दोघांचा एकाच झाडाला गळफास, तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी; बंगळूरूमधून एकाला अटक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.