Chandrapur Accident : डीजेचं सामान घ्यायला गेले, पण घरी परतलेच नाहीत! अपघातात 4 ठार, बचावलेला एकजण शॉकमध्ये
Gadchiroli Accident : बोलेरो गाडीतून परतत असताना रात्री रस्त्यावर एक गाय बसल्याचं चालकाच्या लक्षात आलं. गायीला वाचवण्यासाठी चालकानं स्टेअरींग जोरात फिरवलं. पण यात गाडीचा स्टेअरींग रॉडच तुटला आणि...
पंकज बागडे (Pankaj Bagde) हा गडचिरोलीतील तरुण डीजे वादक. अल्पावधित त्याने आपली ओळख तयार केली होती. वय अवघं 26 वर्ष. डीजेची आवड त्याला त्याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे घेऊन गेली. डीजेसंदर्भातीलच सामान खरेदीसाठी चंद्रपूरला (Chandrapur Accident News) जाण्याचा बेत त्याने आखला. पंकजसह दोघे मित्र आणि एक दाम्पत्य असे पाच जण मिळून चंद्रपूरला निघाले. डीजेचं सामान घेतली आणि पुन्हा घरी परतीच्या वाटेला लागले. पण प्रवासात भयंकर प्रसंग घडला. नवरा-बायकोसह पंकज आणि त्याच्या आणखी एका मित्राचा दुर्दैवी अंत कार अपघातात (Car Accident) झाला. गाडीचा तर चक्काचूर झाला होता. बचावलेल्या एका मित्राला स्थानिकांनी कसंबसं गाडीतून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. शुद्धीवर येईपर्यंत त्याच्याही मनावर मोठा आघात झाला होता. तरुण पंकजसह गेलेल्या मित्रासह दाम्पत्याच्या मृत्यूने गडचिरोलीत एकच खळबळ उडाली.
चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली-गडचिरोली महामार्गवर रात्री पंकज बागडे आणि त्याचे सवंगडी घरी यायला निघाले होते. रात्री प्रवास करत असताना डिजेचं सामना घेऊन ते घर गाठण्याच्या प्रयत्न असताना सावली आणि किसान नगर जवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. महिंद्रा बोलेरोने घरी परतण्यासाठी निघालेले पंकज आणि त्याचे मित्र जिवंत घरी परतूच शकले नाही. तरुण मुलांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर चारही जणांच्या घरी करण्यात आलेल्या आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
असा झाला अपघात…
बोलेरो गाडीतून परतत असताना रात्री रस्त्यावर एक गाय बसल्याचं चालकाच्या लक्षात आलं. गायीला वाचवण्यासाठी चालकानं स्टेअरींग जोरात फिरवलं. पण यात गाडीचा स्टेअरींग रॉडच तुटला आणि बोलेरो कार बाजूच्या ट्रकवर जोरात आदळली. यामुळे गाडीतील सर्वांना जबर मार बसला. काहींना डोक्यालाच मोठा भीषण मार असला होता. या अपघातावेळी झालेला आवाजही काळजाचा ठोका चुकवणारा होता. अखेर आजूबाजूच्या लोकांनी मोठा आवाज झाला म्हणून नेमकं काय घडलं, हे पाहण्यासाठी धाव घेतली.
कारचा अपघात झाल्याचं कळताच स्थानिक नागरिकांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. सावली आणि किसान नगर येथील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, या मार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहन अखेर रस्त्याच्या बाजूला करण्यात आलं. त्यानंतर हळूहळू या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
सावली पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास केला जातो आहे. या अपघातात जखमी झालेल्या 23 वर्षांच्या सुरेंद्र हरेंद्र मसराम या तरुणावर रुग्णालयात उपतार सुरु आहे.
मृतांची नावे :
- पंकज किशोर बागडे वय 26 रा.गडचिरोली,
- अनुप रमेश ताडूलवार वय 35 वर्ष रा.विहीरगाव ता.सावली
- महेश्ववरी अनुप ताडूलवार वय 24 वर्ष रा. विहीरगाव
- मनोज अजय तीर्थगिरीवार वय 29 रा.ताडगाव ता.भामरागड जिल्हा गडचिरोली