चंद्रपूर : कुत्र्याला चिरडले म्हणून बस मालकाविरोधात चंद्रपुरातील श्वानप्रेमीने दिलेली 8 वर्षांची लढाई अखेर यशस्वी झाली आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या कुत्र्यासाठी तीन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. चंद्रपूरच्या उमेश भटकर यांनी लाडक्या कुत्र्यासाठी संघर्ष केला होता. 1 लाख 62 हजारांची नुकसानभरपाई अधिक 8 वर्षांचे व्याज अशी रक्कम भटकरांना देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. वाहन चालकांना अद्दल घडावी यासाठी संघर्ष केल्याची भावना भटकर यांनी बोलून दाखवली आहे.
बसने उडवल्यामुळे झालेल्या लाडक्या कुत्र्याच्या मृत्यूसाठी तीन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश चंद्रपुरात न्यायालयाने दिले आहेत. चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील ही घटना आहे.
तुकुम येथील रहिवासी उमेश भटकर यांच्या लाडक्या श्वानाचे ‘जॉन’ असे नाव होते. भटकर हे 10 जानेवारी 2013 रोजी सकाळी आपला 11 महिन्यांचा कुत्रा ‘जॉन’ला अय्यप्पा मंदिराजवळ फिरवत होते. त्यावेळी एका भरधाव स्कूल बसने त्यांच्या कुत्र्याला धडक दिली. ज्यामध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला.
हा कुत्रा भटकर कुटुंबाचा लाडका कुत्रा होता. आपले दुःख बाजूला ठेवत लाडक्या कुत्र्याला न्याय मिळवून देण्याचे त्यांनी ठरवले आणि एक, दोन नव्हे तर तब्बल 8 वर्षे न्यायालयीन लढाई लढली. अपघाताला दोषी असलेला बसचालक आणि इन्शुरन्स कंपनीकडून 3 लाख रुपये भरपाई मिळवली.
अपघात करणाऱ्या आरोपी चालकाने कुत्र्याच्या मालकाला एकूण 3 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे. अंसारी यांनी दिला आहे. बसचालकांना वेगाविषयी अद्दल घड़ावी या साठी हा संघर्ष केल्याची भावना भटकर यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या :
‘हॅलो, मी गैता जैन बोलतेय’ मुंबईत आमदाराच्या नावाने खंडणी वसुली, महिलेसह तिघांना अटक
कल्याणमधील ‘त्या’ जखमी महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू, मुलावर खूनाचा गुन्हा दाखल
विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी दिल्लीहून जयपूरला आलेल्या प्रियकराला चाकूने भोसकले