साक्षगंधानिमित्त बॅग खरेदीसाठी गेलेली बहीण परतलीच नाही; दुचाकीने कट मारल्याचं निमित्त झालं अन्…

किरणचा विवाह ठरल्याने ती आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. दोन दिवसांनंतर तिचा साक्षगंध होणार होता. या अपघाताची माहिती होताच तिच्या आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला.

साक्षगंधानिमित्त बॅग खरेदीसाठी गेलेली बहीण परतलीच नाही; दुचाकीने कट मारल्याचं निमित्त झालं अन्...
साक्षगंधासाठी बॅग खरेदीसाठी गेलेली बहीण परतलीच नाहीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 9:36 AM

भंडारा: अत्यंत कष्टाने सीआरपीएफमध्ये नोकरीला लागली… मुंबईत तिची नियुक्ती होती… तिचं लग्नही ठरलं होतं… त्यामुळे तिच्या डोळ्यात सुखी संसाराचं स्वप्न होतं… साक्षगंधासाठी (साखरपुडा) ती आपल्या गावी आली होती… साक्षगंधाची सर्व तयारी सुरू होती. साक्षगंधासाठी बॅग खरेदी करता यावी म्हणून ती भावासोबत बाइकवरून गेली. मात्र, काळाने तिच्यावर घाला घातला. समोरून येणाऱ्या दुचाकीने कट मारल्याने त्यांची बाइक कोसळली आणि पाठून येणाऱ्या ट्रकखाली तिचं डोकं चिरडलं गेलं. या अपघातात तिचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या साक्षगंधासाठी बॅग खरेदी करणाऱ्यासाठी भावासोबत दुचाकीवर गेलेल्या सीआरपीएफ जवान असलेल्या बहिणीचा दुर्देवी मृत्यू झाला. समोरून येणाऱ्या दुचाकीने कट मारल्याने बहीण-भावाची दुचाकी रस्त्यावर कोसळल्यानंतर अचानक मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली डोके चिरडून बहीण जागीच ठार झाली. तर भाऊ गंभीर जखमी झाला.

हे सुद्धा वाचा

ही हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलावर घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. किरण सुखदेव आगाशे (25) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर लोकेश सुखदेव आगाशे (21) असं जखमी तरुणाचं नाव आहे. ते मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द येथील राहणारे आहेत.

किरण ही मुंबईत सीआरपीएफ कॅम्पमध्ये नोकरीला होती. ती आपला लहान भाऊ लोकेशसोबत तुमसर येथे बॅग खरेदीसाठी आली होती. खरेदी करून दुचाकीने ते (एमएच 36 ए 6693) निलजकडे जात होते. देव्हाडी उड्डाणपुलावरून जाताना समोरून आलेल्या दुचाकीने कट मारल्याने दोघेही भाऊ बहीण रस्त्यावर पडले.

दरम्यान मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकखाली किरणचे डोके चिरडले गेले आणि ती जागीच ठार झाली. त्यामुळे काही क्षणातच घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला. किरणच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला होता. तर भाऊ लोकेश हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

किरणचा विवाह ठरल्याने ती आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. दोन दिवसांनंतर तिचा साक्षगंध होणार होता. या अपघाताची माहिती होताच तिच्या आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला. घरात साक्षगंधासाठी असलेले आनंदाचे वातावरण एका क्षणात दुःखात बुडाले. तर किरणच्या दुर्देवी मृत्यूमुळे संपूर्ण निलज गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.