Nagpur Crime | नागपुरात ड्रग्सचा कारभार, तरुण पिढी नशेच्या आहारी; छाप्यात एका तस्कराला बेड्या, दुसरा पळाला
नागपुरात ड्रग तस्करी वाढत आहे. पाचपावली पोलिसांनी एक कारवाई करत एमडी ड्रग आणि गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून एमडी ड्रग आणि गांजा जप्त केला. पोलिसांकडून होत असलेल्या कारवाया बघता नागपूर शहर आता ड्रग तस्करांचं केंद्र बनणार का? असे प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे.
नागपूर : शहरात वाढत्या गुन्हेगारी बरोबरच ड्रग्सचा कारभार देखील घट्ट होतोय. शहरात विविध ठिकाणी अवैध पद्धतीने गुन्हेगार ड्रग्स तस्करीमध्ये सक्रिय आहेत. तरुण पिढीला नशेच्या आहारी ढकलत आहे. पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही युवक खुलेआम ड्रग्सची तस्करी (Smuggling) करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून छापा ( Raids) मारल्यानंतर आरोपी सन्नी माखिजा (Sunny Makhija) नावाचा युवक तस्करी करताना आढळला. मकसुद नावाचा आरोपी तिथून पळण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी सन्नीकडून एमडी 4.10 ग्रॅम ज्याची किंमत 1लाख 10 हजार तर 15 हजारांचा गांजा जप्त केला. सन्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
नेमकं काय घडलं
पाचपावली पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार, काही युवक ड्रग्सची तस्करी करतात. पोलिसांनी सापळा रचला. त्यांनंतर पोलिसांनी छापा मारला. सन्नी माखिजा नावाचा तस्कर तस्करी करताना सापडला. पण, मकसूद नावाचा आरोपी तिथून पळून गेला. सन्नीकडं एमडी तसेच गांजा सापडला. तो जप्तही करण्यात आला. तसेच पोलिसांनी सन्नीला ताब्यात घेतले. पण, दुसरा आरोपी तिथून पळून गेला. पळून गेलेल्या मकसूदला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. एकंदरित नागपुरात तस्करी सुरू आहे. त्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल, हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
एका आरोपीचा पीसीआर मिळविला
न्यायालयात सादर करून PCR मिळविला तर दुसऱ्या आरोपीचा शोध पाचपावली पोलीस घेत आहे. अशी माहिती पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली. नागपुरात ड्रग तस्करी वाढत आहे. पाचपावली पोलिसांनी एक कारवाई करत एमडी ड्रग आणि गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून एमडी ड्रग आणि गांजा जप्त केला. पोलिसांकडून होत असलेल्या कारवाया बघता नागपूर शहर आता ड्रग तस्करांचं केंद्र बनणार का? असे प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे. काही युवक ड्रग्सच्या आहारी जातात. त्यामुळं त्यांचं तारुण्य उद्धवस्थ होते. त्यामुळं या ड्रग्सवर नियंत्रण मिळविणं आवश्यक आहे.