नागपूर : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात काही थंडावलेली गुन्हेगारी पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गांजा व इतर अमली पदार्थांच्या तस्करीला पुन्हा सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशा गुन्हेगारांचा वावर वाढू लागला आहे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळण्याची मोहीम हाती घेतली असून तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 5 किलो इतक्या वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करीत असून पुढील तपासातून त्याच्या साथीदारांची नावे उजेडात येतात का, याकडे लक्ष देऊन आहेत. (Drug smugglers spread in Nagpur; One arrested and 5 kg of cannabis seized)
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस रात्रीची पेट्रोलिंग करीत होते. पोलिसांची गाडी तीनखंबा चौक परिसरात गस्त घालत होती. याचदरम्यान एक इसम मोटारसायकलवरून संशयितरित्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या गाडीवर असलेल्या बॉक्सबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्याने बॉक्समध्ये नेहमीचे सामान असल्याचे सांगून पोलिसांना टोलवण्याचा प्रयत्न केला. तो योग्यप्रकारे उत्तर देत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावर त्याला पोलिसांनी ताकीद देताच त्याने खाकी रंगाचा बॉक्स उघडला. त्यात तस्करीसाठी नेत असलेला गांजा आढळून आला. बॉक्समध्ये तब्बल 5 किलो गांजा होता. संबंधित इसम हा गांजा कोणाला तरी विकण्यासाठी घेऊन निघाला होता. पोलिसांनी गांजा जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे. शेख इर्शाद शेख मोहमद असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर याआधीसुद्धा अमली पदार्थांसंबंधी विविध गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याची सखोल चौकशी करीत आहेत.
नागपुरात ड्रग्ज तस्कर आणि गांजा तस्करांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पोलीस सध्या कोरोनाच्या मोहिमेमध्ये व्यस्त असल्याची संधी साधून तस्कर मोकाट सुटले आहे. तस्करांच्या टोळ्या सक्रिय असल्याचा संशय आहे. टोळीतील मुख्य आरोपी आपल्या लोकांमार्फत हा व्यवसाय करून अवैधरित्या पैसे कमवत आहे. त्यामुळे अशा आरोपींच्या मुसक्या वेळीच आवळणे गरजेचे झाले आहे, अशी प्रतिक्रया तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी दिली. (Drug smugglers spread in Nagpur; One arrested and 5 kg of cannabis seized)
दिलासादायक! राज्यात आज 6,017 नव्या रुग्णांची नोंद, 66 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू#coronavirus #coronawave #coronapatients #coronamaharashtra #coronalockdownhttps://t.co/x0WQsFU7Qc
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2021
इतर बातम्या
आईच्या डोळ्यादेखत दोन चिमुरडी नाल्यात वाहून गेली, रायगडमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना