नागपुरात ईडीचे धाडसत्र, अनिल देशमुखांच्या निकटवर्तीय कुटुंबाच्या बंगल्यावरही छापा

राज्याची उपराजधानी नागपुरात आज तीन ठिकाणी ईडीने छापे मारले. ईडीच्या अधिकार्‍यांकडून नागपुरातील सदर परिसरात न्यू कॉलनी भागांमध्ये एका बंगल्यांमध्येही चौकशी सुरु आहे, अशी माहिती आहे

नागपुरात ईडीचे धाडसत्र, अनिल देशमुखांच्या निकटवर्तीय कुटुंबाच्या बंगल्यावरही छापा
Nagpur ED Raid
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 1:25 PM

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात आज तीन ठिकाणी ईडीने छापे मारले. ईडीच्या अधिकार्‍यांकडून नागपुरातील सदर परिसरात न्यू कॉलनी भागांमध्ये एका बंगल्यांमध्येही चौकशी सुरु आहे, अशी माहिती आहे ( ED Raid In 3 Places In Nagpur Along With The Bungalow Of Family Who Are Close To Anil Deshmukh).

समित आइजेक यांच्या बंगल्यावर धाड

सदर परिसरात न्यू कॉलनी भागातील आइजेक कुटुंबियांचा हा बंगला असून समित आइजेक हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जवळचे मानले जातात. मिळालेल्या माहिती प्रमाणे आज सकाळी साडेसात वाजता ईडीचे तीन अधिकारी न्यू कॉलनी परिसरात आइजेक कुटुंबियांच्या बंगल्यामध्ये दाखल झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत अधिकारी आतमध्ये असून ईडीकडून ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.

व्यावसायिक सागर भटेवार यांच्या घरावर धाड

नागपुरातील व्यावसायिक सागर भटेवार यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली. एका मोठ्या नेत्याशी व्यायसायिक संबंध असल्यामुळे रेड पडल्याची माहिती आहे. सकाळी सात वाजता भटेवार यांच्या शिवाजीनगर परिसरातील घरी ईडीची रेड पडली. साधारण चार तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी सागर भटेवार यांची चौकशी केली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र आणि इलेक्ट्रॅानीक गॅजेट जप्त केल्याची माहिती आहे. सकाळी 7 ते 11 ही रेड चाचली.

याशिवाय, नागपुरातील जाफर नगर परिसरातही एका ठिकाणी ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

ED Raid In 3 Places In Nagpur Along With The Bungalow Of Family Who Are Close To Anil Deshmukh

संबंधित बातम्या :

अखेर रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला, मुंबई पोलिसांची टीम हैदराबादेतील निवासस्थानी

उल्हासनगरात अवघ्या 20 रुपयांसाठी तरुणाची हत्या, पोलिसांनी 2 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.