Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Blast : नागपूरच्या जीपीओ ऑफिसात पार्सल आलेल्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट

नागपूरच्या जीपीओ म्हणजे मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आज संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास एक स्फोट झाला आहे. नाशिकवरून एक पार्सल वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी पाठवण्यात आलं होतं. तेच पार्सल नागपूरच्या मुख्य पोस्ट ऑफिसच्या पार्सल हबमध्ये पोहोचल्यानंतर कर्मचारी त्याला हाताळत असताना त्यामध्ये छोटा स्फोट झाला.

Nagpur Blast : नागपूरच्या जीपीओ ऑफिसात पार्सल आलेल्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट
नागपूरच्या जीपीओ ऑफिसात पार्सल आलेल्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 7:55 PM

नागपूर : नागपूर जीपीओ ऑफिसात एका पार्लस (Parcel)मध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट (Blast) झाल्याची घटना घडली आहे. शेतामधील प्राण्यांना हकलण्यासाठी वाजविण्यसाठी वापरण्यात येणाऱ्या एअर गनमध्ये भरणारा बार भरून आवाज करणारा पदार्थ होता, त्याचा स्फोट झाला. हे पार्सल नाशिकवरून आलं होतं आणि वर्धा येथे जाणार होतं. सगळं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ज्वलनशील पदार्थ (Flammable Material) अशा प्रकारे पार्सलमध्ये पाठविता येते का याचाही तपास केला जात आहे. विशेष बाब म्हणजे नागपूरचे जनरल पोस्ट ऑफिस सिविल लाइन्स परिसरात असून जवळच विभागीय आयुक्त कार्यालय आणि मंत्र्यांचे बंगले असलेलं रविभवन हे सर्किट हाऊस आहे. तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घरही जनरल पोस्ट ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे अशा व्हीव्हीआयपी परिसरात स्फोट होणं नक्कीच गंभीर बाब आहे.

कर्मचारी पार्सल हाताळत असताना स्फोट

नागपूरच्या जीपीओ म्हणजे मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आज संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास एक स्फोट झाला आहे. नाशिकवरून एक पार्सल वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी पाठवण्यात आलं होतं. तेच पार्सल नागपूरच्या मुख्य पोस्ट ऑफिसच्या पार्सल हबमध्ये पोहोचल्यानंतर कर्मचारी त्याला हाताळत असताना त्यामध्ये छोटा स्फोट झाला. त्यामुळे कर्मचारी घाबरले. लगेच पोलिसांना त्याची सूचना देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

सीताबर्डी पोलिस स्टेशनचा पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. ते पार्सल तपासण्यात आले असता त्यामध्ये शेतावर किंवा जंगलात जनावरांना पळवण्यासाठी जे अल्प ते मध्यम प्रतीचे स्फोटक वापरले जातात ते मिळून आले. नाशिकमधील एका अधिकाऱ्याने वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी हे पार्सल पाठवले होते. पोलिसांनी संबंधित स्फोटकं जप्त केली असून ते पार्सल कोणत्या उद्दिष्टाने पाठवण्यात आले होते त्याचा तपास सुरू केला आहे. (Explosion of flammable material in a parcel at GPO office Nagpur)

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.