पत्नीने दारुसाठी पैसे न दिल्याचा राग, बापाने वर्षाच्या पोराला अंगणात फेकलं, आईच्या देखत चिमुकल्याचा मृत्यू

नागपुरात एक बाप आपल्या वर्षभराच्या मुलाचा वैरी झाला (Father Killed One Year Old Son) आणि अत्यंत निर्घृणपणे खून केला.

पत्नीने दारुसाठी पैसे न दिल्याचा राग, बापाने वर्षाच्या पोराला अंगणात फेकलं, आईच्या देखत चिमुकल्याचा मृत्यू
बापाने वर्षाच्या पोराला अंगणात फेकलं
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 2:57 PM

नागपूर : नागपुरात एक बाप आपल्या वर्षभराच्या मुलाचा वैरी झाला (Father Killed One Year Old Son) आणि अत्यंत निर्घृणपणे खून केला. या दारुड्या बापाने आपल्याच पोटच्या मुलाला अंगणातील दगडावर फेकले, ज्यात डोक्याला मार लागल्याने त्या चिमुकल्याचा आईच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला (Father Killed One Year Old Son Because Wife Didn’t Gave Him Money For Alcohol).

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारुड्या बापाने स्वतःच्याच एक वर्षाच्या चिमुकल्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सत्यम भजन कौरती असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर भजन कौरती असे आरोपी बापाचे आहे. या निर्दयी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भजन कौरती हा दारुच्या नशेत घरी आला. तेव्हा त्याने पुन्हा दारु पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याच्या पत्नीने पैसे देण्यासाठी नकार दिला. तेव्हा भजन याने भांडण करायला सुरवात केली.

“मला मुलगी हवी होती, तू मुलाला जन्म दिला”

“मला मुलगी हवी होती, तू मुलाला जन्म दिला”, असं म्हणत भजन कौरती याने त्याच्या एक वर्षीय चिमुकल्या सत्यमला अंगणातील दगडावर फेकले. ज्यामुळे त्याच्या डोक्याला जखम झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

क्षणात ही घटना घडल्याने सत्यमला वाचवण्याची संधी कुणालाही मिळाली नाही. आरोपी भजन कौरती याची पत्नी मथुराच्या तक्रारीवरुन खापा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

मुलीकडून लाकडी दांडक्याने बापाची हत्या

दहा दिवसांपूर्वी सततच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून नागपूरमध्ये एका सावत्र मुलीने आपल्या वडिलांची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली. हिंगणा तालुक्यातील सावळी गावात ही घटना घडली. ज्ञानेश्वर दामाजी गडकर (60) असे मृत इसमाचे नाव आहे. ज्ञानेश्वर गडकर यांच्या सावत्र मुलीने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली आहे. ही मुलगी अल्पवयीन आहे. पीडित मुलीने लाकडी दांड्याने ज्ञानेश्वरच्या तोंडावर आणि डोक्यावर वार केले. ज्यामध्ये ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. सध्या हिंगणा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Father Killed One Year Old Son Because Wife Didn’t Gave Him Money For Alcohol

संबंधित बातम्या :

बहिणीची छेड काढणाऱ्याला बेदम चोपलं, आरोपीच्या निष्पाप भावावर अत्याचार, व्हिडीओ बनवून थेट पोलिसांना आव्हान

पुण्यात तरुणावर टोळक्याचा कोयता हल्ला, शेजारच्या रहिवाशांनी घरात घेतल्याने तरुण बचावला

बॉयफ्रेंडसोबत मजा करायचीय, संपत्तीच्या लोभापोटी अल्पवयीन नातीकडून आजीचीच हत्या, वाचा थरार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.