दाम्पत्यासोबत युवती फिरायला गेली ती परतलीच नाही, तिच्याबाबत नेमकं काय घडलं?

नागपुरातील मुलीला राजस्थानमध्ये नेण्यात आलं. तिला एका दाम्पत्याने पैसे घेऊन लग्न लावून दिलं. असा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात पुढे आला.

दाम्पत्यासोबत युवती फिरायला गेली ती परतलीच नाही, तिच्याबाबत नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 4:29 PM

नागपूर : राजस्थानात मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे गरजू मुली पाहिल्या जातात. त्यांना रोजगाराचं आमिष दाखवून राजस्थानात नेले जाते. तिथं त्यांचं लग्न लावून दिलं जाते. यात कमिशनवर काम करणारे काही दलाल सक्रिय आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना आहे नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील. एक मुलगी ओळखीच्या दाम्पत्यासह फिरायला राजस्थानमध्ये गेली. मात्र ती परत आलीच नाही. त्यामुळे परिवारातील लोकांनी मिसिंगची तक्रार दाखल केली. या तक्रारीचा तपास पोलिसांनी केला. मुलीला राजस्थानमध्ये नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या टीमने राजस्थान गाठत मुलीचा शोध घेतला. आधी त्या दाम्पत्याला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. त्यांनी मुलीचं लग्न झाल्याचं सांगितलं.

ज्या युवकाशी मुलीचं लग्न लावण्यात आलं होतं त्याचा शोध पोलिसांनी घेतला. तो सापडल्यानंतर सगळा प्रकार पोलिसांच्या समोर आला. पोलिसांनी मुलीची चौकशी केली. मुलीने आपली फसवणूक झाल्याचं सांगितलं.

मुलासह दाम्पत्याला अटक

पैसे घेऊन लग्न लावून दिल्याचं सांगितलं. त्यावरून पोलिसांनी राजस्थानातील त्या मुलांसह नागपुरातील दाम्पत्याला अटक केली. अशी माहिती बेलतरोडीचे पोलीस निरीक्षक वैजनती मंडवधारे यांनी दिली.

पोलिसांनी या मुलीची सुटका करून तिला परिवाराच्याया स्वाधीन केलं. मात्र आणखी काही मुलींना अशाचप्रकारे फसवण्यात आलं का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलीस तपासात धक्कादायक प्रकार समोर

फिरायला जाण्याचं सांगत नागपुरातील मुलीला राजस्थानमध्ये नेण्यात आलं. तिला एका दाम्पत्याने पैसे घेऊन लग्न लावून दिलं. असा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात पुढे आला. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी मुलीची राजस्थानमधून सुटका केली. तसचे तीन आरोपींना अटक केली.

अशाप्रकारच्या आणखी काही घटना या दाम्पत्याकडून केली जाण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. आणखी किती मुलींना या दाम्पत्याने फसवले हे तपासात उघड होईल.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.