Gadchorili Accident : गडचिरोलीत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात! चालक-वाहकासह विद्यार्थी गंभीर जखमी, भरधाव बस झाडाला धडकली

Gadchiroli News : या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. अगोदरच अहेरी उपविभागातील बकाल रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतोय.

Gadchorili Accident : गडचिरोलीत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात! चालक-वाहकासह विद्यार्थी गंभीर जखमी, भरधाव बस झाडाला धडकली
गडचिरोलीत बसचा अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 12:06 PM

गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अहेरी आगारातील एसटी महामंडळाच्या बसला (ST bus Accident in Gadchiroli) अपघात झाला. या अपघातात वाहकासह शालेय विद्यार्थी गंभीर झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी म्हणून मानव विकास मिशन (Manav vikas Mission) अंतर्गत एसटी बस चालवल्या जातात. मुलचेरा (Mulchera, Gadchiroli Accident) तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अहेरी आगारातून जवळपास 4 ते 5 बसेस चालवल्या जातात. सोमवारी सकाळच्या सुमारास अहेरी-लगाम-मुलचेरा जाणारी एमएच- 07 सी-9465 क्रमांकाची एसटी बस लगाम परिसरातील शांतिग्राम, लगाम, कोलपल्ली, कोठारी, मल्लेरा येथून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. दरम्यान, या एसटी बसचा अपघात झाल्यानं एकच गोंधळ उडाला. या बसमध्ये जवळपास 20 ते 25 शालेय विद्यार्थी होते. मल्लेरा गाव ओलांडल्यानंतर चाची नाल्याजवळ रस्त्याच्या कडेला थेट जंगलात जाऊन झाडाला आदळली. या अपघातात वाहन चालक आणि वाहक तसेच काही विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. सर्व जखमींना मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात हलविल्याची माहिती आहे. या अपघातामुळे मुलांना शाळेत एसटी बसने पाठवण्याऱ्या विद्यार्थ्यांचे पालकही धास्तावलेत.

जीवघेणा प्रवास

या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. अगोदरच अहेरी उपविभागातील बकाल रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतोय. नियमित बस सेवा नसल्याने अनेक शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाला मुकावे लागत आहे. त्यातच अहेरी आगारातून शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी सोडले जाणारे अनेक बसचे तीन-तेरा वाजले आहे. रस्त्यावरच बिघाड होणे, धावत्या बसचे पार्ट निघून जाणे, कधी डिझेल संपणे आणि अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या एसटी बसचा प्रवास आता धोक्याचा ठरत आहे.

हे सुद्धा वाचा

हा अपघात इतका भीषण होता की त्यात एसटी बसचा अक्षरशः चुराडा झालाय. एसटी बसची काच फुटली असून दर्शनी भागाच्या एसटी बसचा पत्राही पेचून गेला होता. या अपघातात बसची झालेली अवस्था पाहून किती जोरात बस झाडावर आदळली असे, याची कल्पना केलेली बरी. गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाढत्या अपघाताने चिंता वाढवली आहे. सुरुवातील नागपुरात एका विद्यार्थ्यांनी ने आण करणारी व्हॅन नदीत कोसळली होती. त्यानंतर नुकसात मुंबईच्या जवळ असलेल्या वसई भागातही स्कूलबस चिखलातून स्किड झाली होती. सुदैवानं यापैकी कोणत्याही अपघातात जीवितहान झाली नव्हती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.