पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी भोवली, पोलिसाकडून सासऱ्यांची गोळी झाडून हत्या

आरोपी पोलीस जवान आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. हे भांडण मिटवण्यासाठी सासरे मारोती मट्टामी जावयाच्या घरी आले होते. त्यावेळी पोलिसाने त्यांच्यावर गोळीबार केला

पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी भोवली, पोलिसाकडून सासऱ्यांची गोळी झाडून हत्या
गडचिरोलीत जावयाकडून सासऱ्यांची हत्या
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 8:48 AM

गडचिरोली : कौटुंबिक वादातून पोलिसाने सासऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पती-पत्नीतील वाद मिटवण्यास मध्यस्थी करणाऱ्या सासऱ्यांना प्राण गमवावे लागले. गडचिरोलीतील पोलीस दलात कार्यरत शिपायाला अटक करण्यात आली आहे. (Gadchiroli Police Jawan Son in law kills Father in Law)

वाद मिटवण्यासाठी लेकीच्या घरी

आरोपी मनोज गावडे हा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे पोलीस दलात कार्यरत होता. मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. हे भांडण मिटवण्यासाठी सासरे मारोती मट्टामी जावयाच्या घरी आले होते. यावेळी जावई आणि सासरा यांच्यातील वाद विकोपाला गेला.

बंदुकीतुन सासऱ्यांवर गोळ्या

रागाच्या भरात मनोज गावडे याने आपल्याकडे असलेल्या बंदुकीतुन सासऱ्यांवर गोळ्या झाडल्या. त्यात सासरे मारोती मट्टामी यांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील धर्मपुरी वार्तामध्ये मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस शिपाई मनोज गावडेला पोलिसांनी अटक केली आहे.

वसईत सासूकडून सुनेची निर्घृण हत्या

दरम्यान, वसईत सासूने सुनेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गेल्या वर्षी उघडकीस आली होती. हत्येनंतर सासूने स्वत:च पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली होती. सून झोपेत असताना सासूने तिच्या डोक्यात फ्लॉवर पॉटने सात ते आठ वेळा वार केले होते. सुनेविषयीच्या द्वेषातून सासूने टोकाचं पाऊल उचललं होतं.

लग्नापासूनच सासू त्रास देत असल्याचा आरोप मयत सूनेच्या वडिलांनी केला होता. लग्नात सर्व काही देऊनही माझ्या मुलीला सासू त्रास देत होती, म्हणून तिला झोपेतच मारलं, असा आरोपही माहेरच्यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

अमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार

पुण्यात मास्कचा गैरफायदा घेत नवऱ्याचा प्रताप, कडक लॉकडाऊनमध्ये पत्नीची संपत्ती हडपली

(Gadchiroli Police Jawan Son in law kills Father in Law)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.