Tiger attack : शेतातून परतत असताना वाघाची झडप, गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकरी जागीच ठार

Gadchiroli Tiger attack News : शेतकरी हा एकटाच जंगलातून घरी परतत होता. त्यावेळी वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढवला. नीलकंठ गोविंद मोहर्ले अशा या शेतकऱ्यांचे नाव आहे.

Tiger attack : शेतातून परतत असताना वाघाची झडप, गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकरी जागीच ठार
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठारImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 8:44 AM

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यामध्ये वाघांची दहशत (Terror of Tiger in Forest) कायम आहे. आता आणखी एकाचा वाघाच्या हल्ल्यात बळी (Gadchiroli Tiger Attack) गेला आहे. त्यामुळे संतापही व्यक्त केला जातोय. गडचिरोलीतील दिभना जंगलात वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला. वाघाच्या या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार झाला. वाघ लपून बसला होता. तर शेतकरी हा एकटाच जंगलातून घरी परतत होता. त्यावेळी वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढवला. नीलकंठ गोविंद मोहर्ले अशा या शेतकऱ्यांचे नाव आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्यानं शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात एकच खळबळ उजाली आहे. सोबत कुणीच नसल्यानं शेतकऱ्याला वाघाच्या तावडीतून आपला बचाव करता आला नाही. वाघाने झडप घालून शेतकऱ्याला रक्तबंबाळ करुन सोडलं. या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

लपूस बसला होता.. आणि अचानक झडप

लाकडं आणण्यासाठी हा शेतकरी जंगलात गेला होता. त्यावेळी लपून बसलेल्या वाघानं शेतकऱ्यावर हल्ला चढवला आणि त्याला ठार केलं. यानंतर शेतकऱ्यांचा जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेला मृतदेह ताब्यात घेण्यात आला. आता हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

जंगलात न जाण्याचं आवाहन

वनविभागातर्फे वेळोवेळी लोकांना जंगलात न जाण्याचं आवाहन करण्यात येतं. पण स्थानिकांकडून घर कामासाठी लाकडं आणणं, सरपण तोडायला जाणं, रान भाज्या विकाण्यासाठी जंगलात त्या तोडायला जाणं, असे प्रकार सुरुच ठेवलेत. त्यामुळे आता जंगलातील वाघाच्या हल्ल्यापासून लोकांचं रक्षक कसं करायचं, असा प्रश्नही वनविभागासमोर उभा ठाकला आहे.

हे सुद्धा वाचा

वाघाचे हल्ले सुरुच

दरम्यान, 16 जूनलाही वासुदेव मेश्राम नावाच्या 36 वर्षीय शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर गेल्या तीन महिन्याच्या वाघाच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 4 मे रोजी एक आपल्या मैत्रिणीला जंगलात फिरायला घेऊन गेलेल्या एका तरुणावरही वाघानं हल्ला केला होता. या हल्ल्यात अजित सोमेश्वर नाकाडे हा युवक ठार झाला होता. तर 13 मे रोजी एक शेतकरी महिला पती आजारी म्हणून शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेली असता तिच्यावरही वाघाने हल्ला केला होता. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या मानेला पकडून शंभर मीटर दूरवर तिला वाघानं फरफटत नेलं होतं. या घटनेनं परिसरात एकच घबराट पसरली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यामुळे खळबळ माजलीय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.