Gondia : गर्लफ्रेन्डसोबत थांबलेल्या तरुणाचं विषप्राशन! गोंदियाच्या एव्हरग्रीन हॉटेलात खळबळ, 8 महिन्यातली तिसरी घटना

Gondia Crime News : एव्हरग्रीन हॉटेलमध्ये याआधी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न होण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तर गेल्या आठ महिन्यात तिसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न एव्हरग्रीन हॉटेलात झालाय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.

Gondia : गर्लफ्रेन्डसोबत थांबलेल्या तरुणाचं विषप्राशन! गोंदियाच्या एव्हरग्रीन हॉटेलात खळबळ, 8 महिन्यातली तिसरी घटना
धक्कादायक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 7:43 AM

गोंदिया : प्रेमी युगुलामध्ये झालेल्या भांडणातून गोंदियात (Gondia Suicide) 23 वर्षांच्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. हॉटेलमध्ये विषप्राशन केलेल्या तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रियकर आणि प्रेयसी (Girl Friend and boy friend) दोघंही हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांच्या भांडण झालं. या भांडणातून नाराज झालेल्या प्रियकराने (Gondia Boy friend Suicide attempt) आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्यामुळे या तरुणाची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अधिक तपास सुरु केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी आत्महत्येची ही घटना घडली, त्या ठिकाणावरही संशय व्यक्त केला जातोय. आत्महत्येचा प्रयत्न होण्याची ही तिसरी घटना उघडीस आल्यानं अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

गर्लफ्रेन्डशी भांडून आत्महत्येचा प्रयत्न

गोंदिया जिल्ह्यातील आंबाटोली फुलचुर येथे राहणारा शतक जांगडे हा 23 वर्षीय तरुण आपल्या प्रेयसीसोबत एव्हरग्रीन हॉटेलात थांबता होता. यावेळी शतक जांगडे यांचं आपल्या प्रेयसीसोबत भांडण झालं. त्यानंतर शतक याने विष प्रशानकरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार गोंदियामधील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये घडला.

8 महिन्यातली तिसरी घटना…

एव्हरग्रीन हॉटेलमध्ये याआधी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न होण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तर गेल्या आठ महिन्यात तिसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न एव्हरग्रीन हॉटेलात झालाय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. शिवाय पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या शतक जांगडे या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर वाढत्या आत्महत्येच्या घटना रोखण्याचं आव्हानही पोलिसांसमोर उभं ठाकलंय. सध्या गोंदिया पोलिसांकडून या आत्महत्येच्या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रेमी युगुलामध्ये भांडण कशावरुन झालं? शतकने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे घेतला, या सगळ्याचा आता पोलिसांकडून शोध घेतला जातोय. मात्र तरुणाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं कळल्यानंतर जांगडे कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.