Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुऱ्हाडीचा घाव बापाच्या जिव्हारी लागला, भयंकर हत्याकांडाने अख्खा गाव थबकला !

पोटच्या मुलानेच जन्मादात्या पित्याला संपवलं? पोलिसांच्या तपासातून धक्कादायक कारण उघडकीस

कुऱ्हाडीचा घाव बापाच्या जिव्हारी लागला, भयंकर हत्याकांडाने अख्खा गाव थबकला !
धक्कादायक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 4:05 PM

गोंदिया : पोटच्या मुलाने आपल्या वडिलांचीच हत्या (Gondia Father murder) केली असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भाऊबीजेच्या दिवशीच हे धक्कादायक हत्याकांड घडलं. चक्क कुऱ्हाडीने वार करत मुलाने वडिलांचा जीव घेतलाय. याप्रकरणातील आरोपी मुलाला पोलिसांनी अटक (Murderer Son arrested) देखील केलीय. गोंदिया पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मोतिराम टांगसू कुंभरे, वय 60 असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सडक अर्जुनी (Sadak Arjuni Taluka, Gondia) तालुक्यातील मोकासीटोला इथं घडलेल्या या घडनेनं एकच खळबळ माजलीय.

वाद छोटा, राग मोठा

गोंदिया जिल्ह्यातील मोकासीटोला इथं गोवर्धन पुजेच्या कार्यक्रमावेळी बाप आणि मुलामध्ये भांडण झालं. मोतिराम टांगसू कुंभरे आणि आरोपी मुलगा यांच्या घरगुती कारणावरुन खटके उडाले. क्षुल्लक भांडणाच्या राग मुलाला सहन झाला नाही. त्याने थेट कुऱ्हाड हातात घेतली आणि वडिलांवर त्याने समासप वार केले.

दिवाळीचं गायगोधन आणि भाऊबीजच्या दिवशी घडलेल्या घडलेलं संपूर्ण गावात खळबळ उडाली. ऐन दिवेलागणीच्या वेळेला घडलेल्या या हत्याकांडामुळे सगळ्यांच मोठा धक्का बसला होता. अखेर पोलिसांना या हत्याकांड प्रकरणाची माहिती देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

गोंदिया जिल्ह्यतील डुग्गीपार पोलीस ठाण्यात या हत्याप्रकरणाची नोंद करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा नोंद केलाय. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय.

मोतिराम यांचं मुलासोबत नेमकं भांडण कोणत्या कारणावरुन झालं? मुलाचा याआधीही वडिलांवर राग होता का? मुलाने टोकाचं पाऊल उचलण्यात नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.