Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो हिरोगिरी करायला गेला, ती ओरडली; बघ्यांनी असा दिला चोप

अल्पवयीन मुलीची छेड का काढली, असा सवाल आरोपी तरुणाला विचारन्यात येत आहे. तो गुमान मार खात आहे. मी काही केले नाही, अशी सफाई देत आहे.

तो हिरोगिरी करायला गेला, ती ओरडली; बघ्यांनी असा दिला चोप
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 5:23 PM

भंडारा : मोहाडी येथील बसस्थानक हा शहराच्या बाहेर आहे. त्यामुळे तिचं अश्लील चाळे केले जात असल्याच्या तक्रार नेहमी होत असतात. असाच एक युवक आजूबाजूला कुणी नसताना पाहून एका मुलीच्या मागे लागला. ती मुलगी अल्पवयीन होती. तो तिचा पाठलाग करत होता. त्यामुळे ती घाबरली. ती ओरडली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोकं जमा झाले. तो तिचा पाठलाग करत असल्याचे तिने सांगितलं. त्यानंतर नागरिकांच्या हातात तो लागला. नागरिकांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला. यामुळे तो तरुण चांगलाच भेदरला होता. पण, मार खाल्ल्याशिवाय दुसरं काही करू शकत नव्हता. कारण लोकांच्या नजरेत तो आरोपी होता. त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्याच्यावर चांगलाच हात साफ केला.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त जमवाकडून चांगलाच चोप मिळाला. ही घठना घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीतील बसस्थानक परिसरातील घडली आहे. या संबंधीचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे. संबंधित पीडित तरुणी ही मोहाडी बसस्थानक परिसरात लघुशंकेसाठी गेली होती. आरोपीने तिची छेड काढली आहे. मुलीच्या आरडाओरड लक्षात घेता जमलेल्या गर्दीने आरोपी तरुणाला चांगलाच चोप दिला. आता याच्या व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

अल्पवयीन मुलीची छेड का काढली, असा सवाल आरोपी तरुणाला विचारन्यात येत आहे. तो गुमान मार खात आहे. मी काही केले नाही, अशी सफाई देत आहे. पण, मारहाण करणारे त्याची काही पर्वा करत नाही. ती का ओरडली. ती का घाबरली, अशा प्रश्नांची सरबत्ती करून त्याची चांगलीच धुलाई करत आहेत. त्यानंतर पुन्हा काही लोकं आले. त्यांनीही त्या तरुणाची चांगलीच धुलाई केली. काही जण या घटनेचे चित्रीकरण करत आहेत. हा व्हिडीओ तुफान चर्चिला जात आहे. मुलींची छेड काढाल तर काही खैर नाही, असा संदेश यातून दिला जात आहे.