Honey Singh : तब्बल चार तासांनी हनी सिंगची नागपूर पोलिसांकडून सुटका

स्थानिक व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 26 एप्रिल 2014 रोजी हनी सिंग याच्याविरोधात पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2015 रोजी सत्र न्यायालयाने त्याला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान पाचपावली पोलिस ठाण्यात हजर व्हॉईस सँपल देण्याचे आदेश दिले होते.

Honey Singh : तब्बल चार तासांनी हनी सिंगची नागपूर पोलिसांकडून सुटका
यो यो हनी सिंग
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 2:09 AM

नागपूर : अश्लील नृत्य आणि गीते सादर केल्याप्रकरणी यो यो हनी सिंग (Honey Singh) सध्या अडचणीत सापडला आहे. हनी सिंग विरोधात 2014 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी रविवारी नागपूरमधील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. हनी सिंग याच्या गाण्याचे सँपल (Voice Sample) घेण्यासाठी पाचपावली पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आवाजाचे सँपल देऊन तब्बल चार तासांनी हनी सिंग बाहेर पडला. हनी सिंग याला अपलोड केलेल्या गाण्याची स्क्रिप्ट दिली आणि तेच गाणं त्याला तीन वेळा गायला सांगितले. पोलिसांनी ही संपूर्ण प्रक्रिया पंचांसमक्ष केली आणि त्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर त्याची पोलिस स्टेशनमधून सुटका करण्यात आली. तब्बल चार तास ही प्रक्रिया सुरू होती. हे संपूर्ण आवाजाचे नमुने आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. (Honey Singh released by Nagpur police after four hours)

स्थानिक व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 26 एप्रिल 2014 रोजी हनी सिंग याच्याविरोधात पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2015 रोजी सत्र न्यायालयाने त्याला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान पाचपावली पोलिस ठाण्यात हजर व्हॉईस सँपल देण्याचे आदेश दिले होते. मात्र हनी सिंगने या आदेशाचे उल्लंघन केले. त्यानंतर न्यायालयात आदेशात बदल करण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळत 12 फेब्रुवारी रोजी पाचपावली पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार हनी सिंग शनिवारी नागपुरात दाखल झाला. मात्र रात्र झाल्याने व्हॉईस सँपल घेणे शक्य नसल्याने त्याला रविवारी बोलावून व्हॉईस सँपल घेण्यात आले.

नागपूरमध्ये बजरंग दलाचा व्हॅलेन्टाईन डे ला विरोध

बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदने नागपुरात इशारा रॅली नावाने याविरोधात आंदोलन केले आहे. व्हॅलेंटाईनडे चा विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आहे. यांनी चक्क टेडी बिअर जाळत विरोध केल्याचे दिसून आलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या. नागपूरच्या तेलंगखेडी परिसरात हे आंदोलन करण्यात आले आहे. रस्त्यावर किंवा गार्डमध्ये प्रेम व्यक्त करण्यावर आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याला यांचा विरोध आहे. त्यामुळे नागपुरातल्या प्रमींना जरा जपून राहवं लागणार आहे. (Honey Singh released by Nagpur police after four hours)

इतर बातम्या

Mumbai Drugs Siezed : मुंबई विमानतळावर 60 कोटींचे ड्रग्ज हस्तगत, झिम्बाब्वेहून आलेली महिला अटक

Murder | फरशीनं वार, 16 वर्षांच्या तरुणाचा खून! परभणी हादरलं, का करण्यात आली निर्घृणपणे हत्या?

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.