सकाळी मुलगा घरी आला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली

प्रेमची मावशी नवनीतनगरात राहत असल्याने त्याचे आई-बाबाकडे जाणे-येणे होते. शुक्रवारी सकाळी प्रेम आईला भेटायला आला. तेव्हा त्याची आई रक्ताच्या थारोड्यात पडली होती.

सकाळी मुलगा घरी आला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 4:02 PM

नागपूर : मनोज सरोदे हा मुळचा आर्वी येथील रहिवासी. गेल्या सहा महिन्यांपासून तो वाडीतील नवनीतनगरात किरायाने राहतो. मनोज एमआयडीसीतील केबल कंपनीत काम करतो. त्याने सोबत पत्नीलाही वाडीत आणले. पत्नी माधुरी ही कंपनीत कामगार म्हणून काम करत होती. त्या दोघांचं फारस पटत नव्हतं. दारुडा नवरा पदरी पडल्याने ती समाधानी नव्हती. मनोजच्या दारुच्या व्यसनाबद्दल त्यांच्या नातेवाईकांना माहीत होते.

दोन्ही मुले नातेवाईकांकडे राहायची

भांडणाची तक्रार नातेवाईकांकडे केल्यास ते त्या दोघांना आर्वीला परत या, असं सांगायचे. पण, ते दोघेही कसेतरी अडजस्ट करून घेत होते. माधुरी आणि मनोजला दोन अपत्य आहेत. मोनिका ही १८ वर्षांची तर प्रेम हा १२ वर्षांचा आहे. मोनीका आर्वी येथे नातेवाईकांकडे राहत होती. तर प्रेम त्याच्या मावशीकडे मुक्कामी राहायचा.

हे सुद्धा वाचा

मुलाने बघीतला आईचा मृतदेह

प्रेमची मावशी नवनीतनगरात राहत असल्याने त्याचे आई-बाबाकडे जाणे-येणे होते. शुक्रवारी सकाळी प्रेम आईला भेटायला आला. तेव्हा त्याची आई रक्ताच्या थारोड्यात पडली होती. त्याचे वडील कुठंही दिसले नाही. त्याच्या आईच्या डोके, पोट आणि तोंडावर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या.

मनोजला आर्वी येथून अटक

आईला पाहताच प्रेमने टाहो फोडला. शेजारी जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपायुक्त अनुराग जैन, पोलीस निरीक्षक प्रवीण तिजारे, पोलीस निरीक्षक प्रदीप रायणावर यांनी घटनास्थळ गाठले. माधुरीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

वाडी पोलिसांना मनोजचा शोध घेतला. मनोजला आर्वी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने रात्रीचा थरार सांगितला. त्या दोघांमध्ये रात्री भांडण झाले. त्यानंतर मनोजने माधुरीवर वार करून तिचा खून केला. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. पण, शेवटी पोलिसांच्या ताब्यात आला.

आधीच नातेवाईकांकडे राहत असलेली मुलं आता पूर्णपणे नातेवाईकांवर अवलंबून राहणार आहेत. कारण आई गेली. वडीलांना पोलिसांना अटक केली. दारुने पुन्हा एक संसार उद्ध्वस्त झाले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.