Nagpur Crime | पतीचे निधन, प्रियकरासाठी दोन्ही मुलींना रेल्वेस्थानकावर सोडले; त्याच्या घरच्यांनी तिलाही घराबाहेर काढले…

| Updated on: Jun 05, 2022 | 1:10 PM

एकीकडं नवरा गेला. प्रियकरानं धोका दिला. त्याच्या घरच्यांना बाहेर काढले. ज्या मुलींना प्रियकरासाठी रेल्वेस्थानकावर सोडले त्या मुलींना आईची पुन्हा माय मिळणार का?

Nagpur Crime | पतीचे निधन, प्रियकरासाठी दोन्ही मुलींना रेल्वेस्थानकावर सोडले; त्याच्या घरच्यांनी तिलाही घराबाहेर काढले...
प्रियकरासाठी दोन्ही मुलींना रेल्वेस्थानकावर सोडले
Follow us on

नागपूर : घटनास्थळ रेल्वेस्थानक. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्याची पहाट. एक दीड आणि दुसरी तीन वर्षांची मुलगी रेल्वेस्थानकाच्या फलाटावर सोडून देण्यात आली. चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी त्यांना जवळ घेतले. लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. या चिमुकल्या मुली कोणाच्या यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. तेव्हा एका निर्दयी मातेने त्यांना तिथं सोडून दिल्याचं लक्षात आलं. या दोन्ही मुलींना श्रद्धानंदपेठेतील (Shraddhanandpeth) खासगी बालगृहात (Kindergarten) ठेवण्यात आले. काही दिवसानंतर या मुलींची आई रेल्वे पोलिसांत (Railway Police) गेली. तिने मुलींची माहिती काढली. ही महिला गोरखपूर येथील राहणारी. पण, वर्षभरापूर्वी तिचे पती मरण पावले. त्यानंतर मोलमजुरी करून ती कुटुंब चालवायची. त्यावेळी तिचे एका मजुराशी प्रेमसंबंध जुळून आले.

प्रियकरासाठी मुलींना सोडले

ती नागपुरात आली. प्रियकरानं तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शविली. पण, दोन मुली त्याच्यासाठी अडचण होती. त्याच्या घरचे तिला मुलींसह स्वीकारणार नव्हते. त्यामुळं तीनं या मुलींना वाऱ्यावर सोडायचं ठरविलं.त्यासाठी तीनं रेल्वेस्थानकावर मुलींना ठेवले होते. त्यानंतर ती प्रियकरासाठी निघून गेली. तिच्या प्रियकराच्या घरी माहिती झालं की ती दोन मुलींची आई आहे. तेव्हा त्याच्या घरच्यांनी तिला नाकारले. घराच्या बाहेर काढले. प्रियकरही शांत राहिला. तेव्हा या महिलेला मुलींची आठवण झाली. दोन्ही मुली या बालगृहात आहेत. आता बालकल्याण समितीच्या निर्णयानुसारच त्या तिला मिळतील.

ममत्वाला आली जाग

नवऱ्याचे निधन झाले. प्रियकराच्या कुटुंबीयांनी तिला स्वीकारले नाही. दोन मुलींची आई असल्याचं समजताच तिला घराबाहेर काढले. मोलमजुरी करून पोट तर भरायचंच आहे. पण, रेल्वेस्थानकावर सोडून दिलेल्या दोन्ही चिमुकल्या मुलींची तिला आठवण झाली. ती रेल्वे पोलिसांत गेली.  मुलींना रेल्वेस्थानकावर सोडणारी मीच ती लाचार महिला असल्याचं तीनं रेल्वे पोलिसांना सांगितलं. आता रेल्वे पोलिसांनी चेंडू बालकल्याण समितीकडं सोपविला. बालगृहात ठेवलेल्या मुलांना त्यांच्या नियमानुसारच परत केले जाईल. त्यामुळं माझ्या मुली मला परत मिळती का, असा प्रश्न ती विचारत आहे. एकीकडं नवरा गेला. प्रियकरानं धोका दिला. त्याच्या घरच्यांना बाहेर काढले. ज्या मुलींना प्रियकरासाठी रेल्वेस्थानकावर सोडले त्या मुलींना आईची पुन्हा माय मिळणार का? आता तिला तिच्या मुली परत मिळतील का. हे प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केल्यानंतरच कळेल. पण, ममत्वाला जाग आली येवढंच म्हणावं लागेल.

हे सुद्धा वाचा