Nagpur Crime | नागपुरात डॉक्टर रुग्णालयात चोर घरी, पळून जाताना एकाला पकडले; दुसरा 8 लाख घेऊन पळाला

डॉक्टर रुग्णालयात गेले. घरी कुणीच नव्हते. ही संधी चोरट्यांनी साधली. डॉक्टरचं घर फोडलं. आतमध्ये प्रवेश करून दागिने ताब्यात घेतले. सुमारे आठ लाख रुपये किमतीचे ते दागिने होते. हे सारे घेऊन चोर पसार होत होते. तेवढ्यात डॉक्टर रुग्णालयातून घरी आले. पाहतात तर चोर पळून जाण्याच्या बेतात होता.

Nagpur Crime | नागपुरात डॉक्टर रुग्णालयात चोर घरी, पळून जाताना एकाला पकडले; दुसरा 8 लाख घेऊन पळाला
एका डॉक्टरच्या घरात चोरी Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 4:29 PM

नागपूर : रामदासपेठ परिसरात राहणारे डॉ. भावेश बरडे (Dr. Bhavesh Barde) हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. 21 तारखेला ते घरात एकटे होते. त्यांना रुग्णालयातून (Hospital) रात्रीच्या वेळी फोन आला. ते रुग्णाला तपासण्याकरिता रुग्णालयात गेले. त्याच संधीचा फायदा घेत दोन चोरटे त्यांच्या घरात घुसले. जवळपास 8 लाख रुपये किमतीचे दागिने त्यांनी चोरले. मात्र तेवढ्यात डॉक्टर आपलं काम आटोपून घरी परतले. त्यांना दोन जण भिंतीवरून उडी मारून जाताना दिसले. डॉक्टरांनी धाडस दाखवत त्यांचा पाठलाग केला. एका चोरट्याला पकडण्यात यश मिळवलं. मात्र एक फरार झाला. यापैकी फरार असलेल्या आरोपीवर वेगवेगळ्या भागात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. अशी माहिती सीताबर्डीचे सहपोलीस निरीक्षक संतोष कदम (Inspector Santosh Kadam) यांनी दिली.

8 लाखांचे दागिने पळवले

नागपुरात मध्यरात्रीच्या सुमारास पॉश एरिया असलेल्या रामदासपेठ परिसरात चोरी झाली. एका डॉक्टरच्या घरात चोरी करत 8 लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी पळविले. मात्र तेवढ्यात डॉक्टर घरी पोहचले. चोरटे पळायला लागले. मात्र डॉक्टरने झुंज देत एका आरोपीला पकडण्यात यश मिळवलं. तर एक आरोपी फरार झाला. डॉक्टरने धाडस दाखवत एका चोराला पकडलं. मात्र फरार झालेला दुसरा चोर सगळा मुद्धेमाल घेऊन पळाला. त्याला पकडून मुद्देमाल रिकव्हर करण्याचं आवाहन पोलिसांच्या समोर आहे.

अशी घडली घटना

डॉक्टर रुग्णालयात गेले. घरी कुणीच नव्हते. ही संधी चोरट्यांनी साधली. डॉक्टरचं घर फोडलं. आतमध्ये प्रवेश करून दागिने ताब्यात घेतले. सुमारे आठ लाख रुपये किमतीचे ते दागिने होते. हे सारे घेऊन चोर पसार होत होते. तेवढ्यात डॉक्टर रुग्णालयातून घरी आले. पाहतात तर चोर पळून जाण्याच्या बेतात होता. तेवढ्यात त्यांनी हिंमत करून चोरांचा पाठलाग केला. एका चोराला त्यांनी पकडले. पण, दुसरा चोर दागिने घेऊन पळाला. पळून जाणाऱ्या चोरावर आणखी काही घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं त्याला अटक करण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.