Nagpur Crime : नागपुरात गाडी चालविण्यावरुन वाद, दोन गटात हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद

काही युवक फुटाळा तलाव परिसरात फिरायला गेले होते. तिथे गाडी चालविण्यावरून त्यांचा वाद झाला. मात्र तो तिथेच निपटून दोन युवक बाईकने 10 नंबर पुलियाकडे निघाले. मात्र रस्त्यात त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपल्याने ते गाडी ढकलत पुढे नेत होते. तेवढ्यात बुलेटवरून दोन जण आले आणि तुम्ही फुटाळाला गेले होते का विचारलं ? त्यांनी हो म्हणताच मारपीट सुरू केली.

Nagpur Crime : नागपुरात गाडी चालविण्यावरुन वाद, दोन गटात हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद
नागपुरात गाडी चालविण्यावरुन वाद, दोन गटात हाणामारी
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 7:30 PM

नागपूर : नागपुरात गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेत नाही. आपसातील वादातून दोन गटात हाणामारी (Fighting) आणि तोडफोड झाल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहेत. हाणामारीची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. फुटाळा तलावावर फिरायला गेलेल्या काही युवकांमध्ये गाडी चालविण्यावरुन वाद (Contro) झाला होता. या वादाचे हाणामारीत पर्यावसन झाले. याप्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (In Nagpur, two groups clashed over a dispute over driving)

गाडी चालविण्यावरुन झाला होता वाद

काही युवक फुटाळा तलाव परिसरात फिरायला गेले होते. तिथे गाडी चालविण्यावरून त्यांचा वाद झाला. मात्र तो तिथेच निपटून दोन युवक बाईकने 10 नंबर पुलियाकडे निघाले. मात्र रस्त्यात त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपल्याने ते गाडी ढकलत पुढे नेत होते. तेवढ्यात बुलेटवरून दोन जण आले आणि तुम्ही फुटाळाला गेले होते का विचारलं ? त्यांनी हो म्हणताच मारपीट सुरू केली. म्हणून ते तिथून पळाले आणि जवळच असलेल्या मधुशाला वाईन शॉपमध्ये शिरले मात्र आरोपीने तिथे येऊन त्यांना बाहेर काढलं. यानंतर जोरदार मारहाण केली आणि तोडफोड सुद्धा केली. मात्र हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आयटी इंजिनिअरला मारहाण

वारंवार हॉर्न वाजवणाऱ्या महिलेला मिडल फिंगर दाखवल्याने एका आयटी इंजिनिअर तरूणाला स्थानिक नागरिकांच्या टोळक्याकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मागच्या आठवड्यात घडली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे-निलख परिसरात ही घटना घडली आहे. आयटी इंजिनिअर तरुणाला मारहाण करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या मारहाणीत आयटी इंजिनिअर तरुण जखमी झाला असून त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या डोक्यात 12 टाके पडले आहेत. (In Nagpur, two groups clashed over a dispute over driving)

इतर बातम्या

Video: 5 जणांचा जीव घेणारी बोलेरो गाडी ट्रकवर कशी धडकली? बुलडाण्याचा भीषण अपघात CCTV मध्ये कैद

Nagpur Murder : पोटचा गोळा रोज घरात झिंगायला लागला, आई अन् भावानं त्याचा निकाल लावला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.