Umesh Yadav : क्रिकेटर उमेश यादवची फसवणूक, मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल

आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी उमेश यादव याने नागपुरातील कोराडी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. उमेशचा जुन्या मॅनेजरनेच त्याची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

Umesh Yadav : क्रिकेटर उमेश यादवची फसवणूक, मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल
भारतीय क्रिकेटर उमेश यादवImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 8:25 PM

नागपूर : भारतीय संघाचा फास्ट बॉलर उमेश यादव याची तब्बल 44 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी उमेश यादव याने नागपुरातील कोराडी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. उमेशचा जुन्या मॅनेजरनेच त्याची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. शैलेश ठाकरे असे फसवणूक करणाऱ्या मॅनेजरचे नाव आहे. ठाकरे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

उमेश यादवचे आर्थिव व्यवहार पहायचा शैलेश ठाकरे

उमेश यादव याला भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्याने त्याला देशात आणि देशाबाहेर खेळण्यासाठी जावे लागते. यामुळे त्याने त्याचा मित्र असलेला आरोपी शैलेश ठाकरे याला पत्रव्यवहार, इन्कम टॅक्स, बँकेचे व इतर व्यवहाराकरीता पगारी मॅनेजर म्हणून ठेवले होते.

उमेशच्या खात्यातील 44 लाख रुपये परस्पर काढून घेतले

आरोपीने उमेश यादव याची कोणतीही कामे केली नाही. तसेच उमेश यादव याने प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कोराडी हद्दीतील एमएसईबी कॉलनी येथील स्टेट बँक शाखेतील खात्यात एकूण 44 लाख रुपये ठेवले होते. ते 44 लाख रुपये शैलेश ठाकरे याने परस्पर काढून स्वतःच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केली. उमेश यादव यांना पैसे परत दिले नाही आणि फसवणूक केली.

हे सुद्धा वाचा

शैलेश ठाकरेविरोधात कोराडी पोलिसात गुन्हा दाखल

कोराडी पोलिसांनी याप्रकरणी कलम 406, 420 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी शैलेश ठाकरेचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.