नागपूर : वाढत्या शहरीकरणाबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असते. नागपूर शहराजवळ कामठी, मौदा, उमरेड, बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर अशी मोठी शहर वसली आहेत. या भागातही नागपूरसारखी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेली काही लोकं कार्यरत आहेत. छ्योट्या चोऱ्यांवर पोलीस सहसा लक्ष देत नाही. पण, चोरीच्या घटना सतत होत असतील, तर पोलिसांसमोर आव्हान असते. हे आव्हान ते कसे पेलतात, यावर चोरीच्या घटना अवलंबून असतात. कामठी शहरात गेल्या महिन्याभरापासून चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली होती. दररोज एकापाठोपाठ चोरीच्या घटना घडत होत्या. वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या चोरीचा घटनेचा अधिक तपास करण्यात आला. नवीन कामठी गुन्हे शाखा पोलिसांना चोरट्यांची गँगमधील तिघांना अटक करण्यात यश आले. अश्फाक वलद युसुफ खान, शेख जाफर वर्ल्ड शेख मुजफ्फर आणि जावेद अन्सारी वलद जलील अहमद अन्सारी हे तिघेही आरोपी राहणार कामगारनगरातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी या तीनही आरोपींकडून नऊ चोरीचा घटना उघडकीस आणल्या आहेत. तर चोरी गेलेले सोने-चांदीचे दागिनेसह एकूण दोन लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अशी माहिती परिमंडळ क्रमांक पाचचे पोलीस उपायुक्त क्षवण दत्त यांनी सांगितले.
नवी कामठी पोलिसांनी कुख्यात चोरट्यांचा गँगमधील तीन आरोपींना अटक केली. 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गुप्त माहितीदार तसेच सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:स्वास सोडला.