चंद्रपूर : पिक अप गाडी उलटून झालेल्या भीषण अपघातात (Chandrapur Accident) एका महिलेला प्राण गमवावे लागले, तर तब्बल 11 जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जखमींमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. ओदिशाहून कामानिमित्त सर्वजण निघाले होते. यावेळी कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी उलटल्याची माहिती समोर आली आहे. रिफ्लेक्टर नसल्याने नव्या चालकांची अडचण होत असल्याचा दावा केला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात रस्ते अपघातात चारचाकी वाहन उलटले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे.
हे नागरिक ओदिशा राज्यातून करीमनगर येथे कामानिमित्त निघाले होते. सर्व जण पिकअप वाहनाने प्रवास करत होते. आकापूर जवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी उलटल्याचे समोर आले आहे.
ओदिशा येथील कामगार महिला पुतना गजपती धरोहा हिचा मृतामध्ये समावेश आहे. जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सामान्य जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे.
आकापूर वळणावर रिफ्लेक्टर लावण्यात आले नसल्याने नव्या चालकांना अडचण भासत असल्याची ओरड वारंवार केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासुन सुरु असल्याने या मार्गावर अपघातात वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या :
Farhan Azmi | आयेशा टाकियाच्या नवऱ्याला अटकपूर्व जामीन, फसवणूक प्रकरणात तूर्तास दिलासा
1998 मध्ये 13 लाखांचा दरोडा, मुंबईकर कुटुंबाला 22 वर्षांनी 8 कोटींच्या वस्तू परत मिळाल्या