Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जिवाच्या आकांताने ओरडणारे 9 जीव आगीत जिवंत जळाले! चंद्रपुरात ट्रक अपघातानंतर अग्नितांडव

Chandrapur Accident : आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत ही आग विझवली.

Video | जिवाच्या आकांताने ओरडणारे 9 जीव आगीत जिवंत जळाले! चंद्रपुरात ट्रक अपघातानंतर अग्नितांडव
चंद्रपुरातील भीषण अपघाताची दृश्यंImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 1:23 PM

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात (Chandrapur Accident) 9 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला होता. पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये (Truck Accident) हा भीषण अपघात झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक मध्ये झाली समोरासमोर धडक झाली. आणि अपघातानंतर भीषण आग (Fire) लागली. या भीषण अपघाताचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये नजरेस पडली. प्लास्टिक पोत्यांमधून हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

यातील टँकरमधील चालक अमरावती निवासी हाफीज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृतात समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा अपघातात कोळसा झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरू आहे.

लाकूड भरलेल्या ट्रकमधील मयत :

1) अजय डोंगरे, 30, बल्लारपूर

2) प्रशांत नगराळे, 33, लावारी, नवी दहेली

3) मंगेश टिपले, 30, लावारी, नवी दहेली

4) भैय्यालाल परचाके, 24, लावारी, नवी दहेली

5) बाळकृष्ण तेलंग, 57, लावारी, नवी दहेली

6) साईनाथ कोडाप, 40, लावारी, नवी दहेली

7) संदीप आत्राम, 22, कोठारी

वाशी खाडीपुलावर अपघात

जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात

संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने वाहतूक खंडित झाली होती. आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली. मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके आग विझवण्यासाठी, तर मूल-रामनगर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

महामार्गावर वाहतूक खंडित

महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होती. एका ट्रकमध्ये पेट्रोल, तर दुसऱ्यामध्ये लाकूड असल्याने आग भडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात दोन्ही वाहनांमधील एकूण नऊ जणांना प्राण गमवावे लागले.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.