VIDEO | पगाराचा चेक का अडवला? महिला मुख्याधिकाऱ्याचा आक्रस्ताळेपणा, अकाऊण्टंटवर वस्तू फेकल्या
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती नगर पंचायतीच्या महिला मुख्याधिकाऱ्याचा आक्रस्ताळेपणा कॅमेरामध्ये कैद झाला आहे. नियमबाह्य देयकांचे धनादेश काढून न दिल्यामुळे त्यांनी लेखापालावर कार्यालयातच हल्ला केल्याचा आरोप आहे.
चंद्रपूर : चंद्रपुरातील (Chandrapur) महिला मुख्याधिकाऱ्याचा आक्रस्ताळेपणा कॅमेरामध्ये कैद झाला आहे. कविता गायकवाड (Kavita Gaikwad) यांनी लेखापालाला जाब विचारत त्याच्यावर हल्ला केल्याचा प्रकार (Lady Officer Attacks Accountant) समोर आला आहे. जाब विचारताना लेखापालाला त्यांनी टेबलवरील वस्तू फेकून मारल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. कविता गायकवाड या चंद्रपुरातील जिवती नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी आहेत. तीन महिन्यांचा पगार न काढल्याच्या रागातून त्यांनी आकाश-पाताळ एक केल्याची माहिती आहे. गायकवाड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी कार्यालयात केलेल्या या आकांड तांडवा बद्दल त्यांच्यावर कारवाई होणार का प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती नगर पंचायतीच्या महिला मुख्याधिकाऱ्याचा आक्रस्ताळेपणा कॅमेरामध्ये कैद झाला आहे. नियमबाह्य देयकांचे धनादेश काढून न दिल्यामुळे त्यांनी लेखापालावर कार्यालयातच हल्ला केल्याचा आरोप आहे. लेखापाल सागर कुऱ्हाडे यांना थेट कक्षात जाऊन मुख्याधिकारी कविता गायकवाड यांनी जाब विचारला. त्यानंतर त्यांना टेबलवरील वस्तू फेकून मारल्याचं समोर आलं आहे.
लेखापालावर टेबलवरील वस्तू फेकून हल्ला
धक्कादायक म्हणजे इतर कर्मचारी समजावत असतानाही मुख्याधिकारी कविता गायकवाड यांनी पुन्हा-पुन्हा टेबलाजवळ येत हल्ला केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हायरल व्हिडीओत गायकवाड आपला 3 महिन्याचा पगार लेखापालाने काढला नसल्याने रागात असल्याचं संभाषणातून स्पष्ट होत आहे. पीडित लेखापाल सागर कुऱ्हाडे यांनी जीवती पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली. चंद्रपुरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर, 22 वर्षीय तरुणासह बापालाही संपवलं, पुण्यातील शाळेमागे हत्याकांड
तीन लाख देऊन ‘लग्नाळू’ तरुण बोहल्यावर, दहाच दिवसात वधू म्हणाली, “सोडा.. मला आधीच दोन…”