खुर्चीला हात-पाय बांधून गळा चिरला, नागपुरात 78 वर्षीय महिलेची घरात निर्घृण हत्या

प्राथमिक दृष्ट्या चोरी किंवा लूटमार करण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचं वाटत आहे, तरी मात्र घरातील साहित्य जसंच्या तसं असल्याने शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे वृद्ध महिलेच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

खुर्चीला हात-पाय बांधून गळा चिरला, नागपुरात 78 वर्षीय महिलेची घरात निर्घृण हत्या
नागपुरात वृद्ध महिलेची हत्या
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 7:40 AM

नागपूर : खुर्चीला हात-पाय बांधून गळा चिरत वृद्ध महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. 78 वर्षीय देवकी जीवनदास बोबडे या निवृत्त वैद्यकीय अधिकारी होत्या. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवार 27 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास देवकी बोबडे ही वृद्ध महिला घरात एकटी होती. त्यावेळी अज्ञात आरोपी त्यांच्या घरात घुसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपींनी आधी देवकी बोबडे यांचे हात पाय खुर्चीला बांधले. त्यानंतर त्यांनी आरडा ओरडा करु नये, या उद्देशाने त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. अखेर गळा चिरुन त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

चोरीच्या उद्देशाने हत्या?

प्राथमिक दृष्ट्या चोरी किंवा लूटमार करण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचं वाटत आहे, तरी मात्र घरातील साहित्य जसंच्या तसं असल्याने शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे वृद्ध महिलेच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

घराच्या पहिल्या मजल्यावर मुलगी-जावई

78 वर्षीय देवकी बोबडे या निवृत्त वैद्यकीय अधिकारी होत्या. नागपूरच्या नंदनवन परिसरात गायत्री कॉन्व्हेंटजवळ असलेल्या घराच्या तळ मजल्यावर त्या पतीसह राहत होत्या. त्यांची मुलगी आणि जावई सुद्धा त्याच घराच्या पहिल्या मजल्यावर राहतात. देवकी यांचे वृद्ध पती जीवनदास बोबडे हे अर्धांगवायूने आजारी आहेत.

नागपूर शहरातील नंदनवन भागात शनिवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. वृद्ध महिलेची हत्या नेमकी कोणी केली, त्याचं कारण काय, याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

संबंधित बातम्या :

फेसबुकवर मुलीच्या नावाने अकाऊंट बनवतो, तरुणांशी मैत्री, मग नोकरीच्या बहाण्याने बोलावून मोबाईल पळवतो

नवी मुंबई दरोडा प्रकरणी पाच जणांना अटक, तीन फरार आरोपींचा शोध सुरु

मांत्रिकाशी 25 लाखांची डील, भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या युवतीचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट, पियुष जिजू कोण?

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.