एकदा पोलिसांनी समज देऊन सोडलं, पुन्हा महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवले, तरुणाला बेड्या

अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महिलेला एक युवक अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवून मानसिक त्रास देत होता. या महिलेने आरोपी युवकाच्या विरोधात खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली

एकदा पोलिसांनी समज देऊन सोडलं, पुन्हा महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवले, तरुणाला बेड्या
अकोल्यात महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवणारा युवक जाळ्यात
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 1:20 PM

अकोला : महिलेला अश्लील व्हिडीओ आणि फोटो (Obscene Video) पाठवणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडल्याचं उघडकीस (Akola Crime) आलं आहे. अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवून युवक महिलेला मानसिक त्रास देत होता. त्यामुळे तिने या युवकाच्या विरोधात पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या. अभिषेक गिरी असं अटक झालेल्या आरोपीचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महिलेला एक युवक अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवून मानसिक त्रास देत होता. या महिलेने आरोपी युवकाच्या विरोधात खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. व्हिडीओचा आधार घेत पोलिसांनी त्या युवकाचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या विरुद्ध 292 आयपीसी कलम 66 (अ) आयटी एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेला अश्लील व्हिडीओ पाठवले

मलकापूर परिसरात राहणारा अभिषेक गिरी हा गेल्या काही दिवसांपासून पीडित महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवत असे. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने या युवकाची माहिती खदान पोलिसांनी दिली आणि पोलिसांनी सापळा रचून आरोपी अभिषेक गिरी याला अटक केली.

आरोपीवर यापूर्वीही गुन्हा

आरोपीकडे असलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्यामध्ये अश्‍लील व्हिडीओ आढळून आले आहेत. यापूर्वी सुद्धा या आरोपी विरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यावेळी समज देऊन या युवकाला सोडून देण्यात आले होते. पण त्याने पुन्हा तीच चूक केली असून त्याला आता अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून डॉक्टरचा अश्लील व्हिडीओ शूट, तरुणीने सव्वातीन लाख उकळले

दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील कृत्य शूट, व्हिडीओ व्हायरल, अमरावतीत तिघांना बेड्या

अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.