दोघे भाऊ बहिणीच्या घरी भांड-भांड-भांडले, वादात मध्यस्थी करणाऱ्या भावोजींची हत्या
अमरावती शहरालगत असलेल्या वलगाव येथील दर्यापूर मार्गावर पाल ठोकून राहणाऱ्या एका 21 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. त्याच्या दोन मेहुण्यांनी आपल्या मित्राच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप आहे.
अमरावती : दोघा भावांनी मित्राच्या मदतीने आपल्याच बहिणीच्या नवऱ्याचा खून (Brother in Law Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 21 वर्षीय तरुणाची हत्या केल्यानंतर तिघेही जण घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून दोघा मेहुण्यांनी भावोजींना संपवल्याचं समोर आलं आहे. अमरावती शहरालगत असलेल्या (Amravati Crime) वलगाव येथील दर्यापूर मार्गावर हा प्रकार घडला. मयत तरुणाच्या पत्नीने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. कन्हैय्या शंकर पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे हत्येच्या दोन दिवसांआधीच दोघे भाऊ बहिणीच्या घरी भांड-भांड-भांडले होते. मात्र या वादात मध्यस्थी करणाऱ्या भावोजींचीच त्यांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
अमरावती शहरालगत असलेल्या वलगाव येथील दर्यापूर मार्गावर पाल ठोकून राहणाऱ्या एका 21 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. त्याच्या दोन मेहुण्यांनी आपल्या मित्राच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप आहे.
वादात मध्यस्थी केल्याचा राग
आरोपी मेव्हण्याचा त्याच्या मित्रासोबत वाद सुरु आहे. या भांडणात मध्यस्थी केली म्हणून दोन मेव्हणे आणि त्यांच्या एका मित्राने जावयालाच संपवून टाकले. या प्रकरणी तिन्ही आरोपी फरार झाले आहेत.
मयत तरुणाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तिघा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वलगाव पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. कन्हैय्या शंकर पवार असे मृत तरुणाचे नाव आहे.
दोनच दिवसांपूर्वी बहिणीच्या घरी वाद
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच तक्रारदार गंगाचे दोन भाऊ म्हणजेच मयत कन्हैयाचे मेव्हणे किसन आणि राजेश हे बहिणीकडे आले होते. रात्री कन्हैया पवारच्या घरी जेवणापूर्वी किसन आणि राजेश यांचा आपसात वादही झाला होता.
संबंधित बातम्या :
माझ्या नवऱ्याने गळा चिरला, शेवटच्या श्वासाआधी डॉक्टर महिलेचा जबाब, हत्येचं कारण काय?
कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला
अखेरपर्यंत मैत्री निभावली, सुप्रिया शिंदे खून प्रकरण, मैत्रिणींमुळे आरोपीचा सुगावा