भंडारा : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन बालिकेवर अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील (Bhandara Crime) लाखांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चप्राड येथे हा प्रकार घडला आहे. या अत्याचारांमुळे बालिका गर्भवती झाल्यानंतर 18 वर्षीय युवकाने लग्न करण्यास नकार दिला. पीडित अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी 18 वर्षीय युवकाविरोधात अत्याचार आणि पॉस्कोसह अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. 27 मार्च रोजी लाखांदूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश दिवाकर हजारे (वय 18 वर्ष, रा. चप्राड) असं घटनेतील आरोपी युवकाचे नाव आहे.
आरोपी युवकाने काही महिन्यांपूर्वी गावातीलच एका अल्पवयीन बालिकेशी प्रेमसंबंध निर्माण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवत पाच महिन्यांपासून तो नियमित अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर अल्पवयीन बालिकेला गर्भधारणा झाली. त्यामुळे पीडित बालिकेने आरोपीला लग्नासाठी गळ घातली.
यावेळी आरोपीने गर्भवती अल्पवयीन बालिकेशी लग्न करण्यास नकार दिला. बालिकेने या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. अल्पवयीन बालिका गर्भवती झाल्याचे माहित होताच कुटुंबियांनी बालिकेसह लाखांदूर पोलिसात धाव घेत आरोपी युवकाविरोधात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी आरोपी युवकाविरोधात अत्याचार आणि पॉस्कोसह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. आरोपी युवकास अटक करण्यात आली आहे.पुढील तपास लाखांदुर पोलिस करत आहेत.
संबंधित बातम्या :
नाते सोडा, माणुसकीही उरली नाही; इगतपुरीत पुतण्याचा चुलतीवर तोंड दाबून बलात्कार
नागपुरात आठ वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचार
चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, पोलिसांनी आत्येभावाला केली अटक