Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सून विहिरीत पाय घसरुन पडल्याचा बनाव उघड, पती-जावा-सासू-सासऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा

शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथे घडली होती

सून विहिरीत पाय घसरुन पडल्याचा बनाव उघड, पती-जावा-सासू-सासऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा
विवाहितेची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 11:53 AM

बुलडाणा : सून विहिरीत पाय घसरुन पडल्याचा सासरच्या मंडळींनी केलेला बनाव अखेर उघड झाला आहे. विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीसह सासऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथे हा प्रकार घडला होता. मात्र तिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची तक्रार तिच्या भावाने केल्यानंतर हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथे घडली होती. दरम्‍यान, ती विहिरीत पडली नसून, तिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत विवाहितेच्या भावाने हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली. त्‍यावरून पोलिसांनी सासरच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील विवाहितेच्या पतीसह सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पाय घसरून विहिरीत पडल्याचा बनाव

खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील 24 वर्षीय लक्ष्मी गजानन राठोड ही दोन दिवसांपूर्वी शेतात हरभरा सोंगण्यासाठी गेली होती. दुपारी शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर तिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली होती. मात्र तिचा पाय घसरून विहिरीत पडल्याचे तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते.

सासरच्या नऊ जणांनी छळ केल्याचा आरोप

दरम्यान मृत लक्ष्मीच्या भावाने हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून लक्ष्मीचा पती, सासू, सासरा, दीर यांच्यासह जावा तिचा छळ करत होत्या, त्यामुळे तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी पोलिसांत तक्रार देण्यात आली. यावरुन हिवरखेड पोलिसांनी लक्ष्मीच्या सासरकडील 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये लक्ष्मीचा पती गजानन राठोड, सासरा जानकीराम राठोड, सासू फुलाबाई राठोड , गजाननचे तीन भाऊ , तिघांच्या पत्नी अशा नऊ जणांचा समावेश आहे. यापैकी जानकीराम राठोड आणि गजानन राठोड या दोघा बापलेकांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

बायकोने Video Call वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने नाराज, बदलापुरात पतीची आत्महत्या

लातूरमधील पोलीस कर्मचारी आत्महत्या प्रकरण, सुसाईड नोटवरुन 12 जणांवर गुन्हा

पोलिस उपनिरीक्षक वाशिमला, अमरावतीत पत्नीची आत्महत्या, आईचा मृतदेह पाहून लेकरांचा टाहो

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.