चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर मेव्हण्याचा दोन वेळा बलात्कार, महिन्याभरानंतरही आरोपी मोकाट

आरोपी मेहुण्याने पीडितेला गाडीत बळजबरीने तोंड दाबून टाकले आणि जालन्याकडे घेऊन गेला. यावेळी मेहुण्याने चालत्या कारमध्येच अल्पवयीन पीडितेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. याची तक्रार पीडितेने चिखली पोलिसांत करुन महिना उलटला, तरीही आरोपी मोकाटच आहे

चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर मेव्हण्याचा दोन वेळा बलात्कार, महिन्याभरानंतरही आरोपी मोकाट
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 3:27 PM

बुलडाणा : एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मेव्हण्याने चालत्या गाडीत दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात उघडकीस आली होती. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून कपडे घेऊन देण्याच्या बहाण्याने बाजारात जात असताना मेव्हण्याने बळजबरीने तिचं तोंड दाबून तिला गाडीत बसवलं. त्यानंतर चालत्या गाडीतच तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. या संदर्भात आरोपी मेव्हण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन आज महिना उलटला, तरीही तो मोकाटच असलयाने चिखली पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तर पीडित कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

काय आहे प्रकरण?

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील माळीपुरा परिसरातील 17 वर्षीय मुलीचा 25 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. जालना येथील तिचा मोठ्या बहिणीचा नवरा तिच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथे सासऱ्यांकडे आला. पीडित मुलगी म्हणजेच मेव्हणीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून कपडे घेऊन देतो, असं सांगत तिला कपड्याच्या दुकानात घेऊन गेला.

नेमकं काय घडलं?

त्या ठिकाणी आरोपीने तिला कपडेही घेतले, मात्र मेव्हणीला घरी न सोडता त्याने आधीपासूनच जुन्या मेहकर रोडवर उभ्या असलेल्या गाडीत तोंड दाबून बळजबरीने टाकले आणि जालन्याकडे घेऊन गेला. यावेळी मेहुण्याने चालत्या कारमध्येच अल्पवयीन पीडितेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. याची तक्रार पीडितेने चिखली पोलिसांत करुन आज महिना उलटला, तरीही आरोपी मेव्हणा मोकाटच असल्याने पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

महिन्याभरानंतरही कारवाई नाही

घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडितेने आपल्या आई-वडिलांसह चिखली पोलीस स्टेशन गाठून आपल्या मेव्हण्याविरुद्ध आणि त्याला सहकार्य करणाऱ्या गाडी चालकाविरुद्ध तक्रार दिली होती. पोलिसांनी 363, 366 अ, 376, 109, 102 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. मात्र आरोपीवर गुन्हा दाखल होऊन आज एक महिन्याचा कालावधी उलटला तरीही आरोपी अद्यापही मोकाटच आहे.

मुस्लिम सेवा संघाने या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा आणि आरोपीला पकडून त्याला कठोर शिक्षा द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन मागणी केली. पोलीस म्हणतात की आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई सुरु आहे, मात्र घटनेला महिना उलटला तरीही आरोपी मोकाटच आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

पुण्यात वहिनीवर बलात्कार, चुलत दिराला अटक

दुसरीकडे, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहिता मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या चुलत दिरालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार करुन दिराने ओढणीने गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे हत्येचा प्रकार समोर आला.

संबंधित बातम्या :

डोंगरावर नेऊन दिराचा वहिनीवर बलात्कार, ओढणीने गळा दाबून हत्या, पुण्यात खळबळ

लग्नाहून परतताना तरुणीवर सामूहिक बलात्कार, लिफ्टच्या बहाण्याने तिघांकडून अत्याचार

हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.