जादूटोण्याच्या संशयातून चंद्रपुरात एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण, भावावर बॅटने वार, बहीण-आईला लाथाबुक्के

तक्रारदार भाऊ जादूटोणा करतो आणि त्यामुळे 25 वर्षीय मयुरी सडमाके हिची तब्येत खराब राहते असा आरोप करत बुधवारी दुपारी प्रमोद सडमाके (35), सीताराम सडमाके (66), मयुरी सडमाके (25), पिल्ला आत्राम (20) आणि चंद्रकला आत्राम (55) अशा पाच जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

जादूटोण्याच्या संशयातून चंद्रपुरात एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण, भावावर बॅटने वार, बहीण-आईला लाथाबुक्के
चंद्रपुरात जादूटोण्याच्या संशयातून मारहाण
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 8:08 AM

चंद्रपूर : जादूटोण्याच्या संशयावरून बहीण-भाऊ आणि त्यांच्या आईला मारहाण करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंडाळा गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या महिन्याभरात चंद्रपुरात जादूटोण्याच्या संशयातून मारहाण होण्याची ही दुसरी घटना आहे.

काय आहे प्रकरण?

फिर्यादी असलेला 40 वर्षीय पीडित भाऊ आणि त्याची 38 वर्षीय पीडित बहीण, तसेच त्यांची सत्तर वर्षीय पीडित आई आणि मारहाण करणारे सर्व आरोपी मिंडाळा गावातीलच रहिवासी आहेत. तक्रारदार भाऊ जादूटोणा करतो आणि त्यामुळे 25 वर्षीय मयुरी सडमाके हिची तब्येत खराब राहते असा आरोप करत बुधवारी दुपारी प्रमोद सडमाके (35), सीताराम सडमाके (66), मयुरी सडमाके (25), पिल्ला आत्राम (20) आणि चंद्रकला आत्राम (55) अशा पाच जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

नेमकं काय घडलं?

बहीण आणि वृद्ध आई यांना लाथा-बुक्क्यांनी तर भावाला बांबू आणि बॅटने मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. जिवती तालुक्यातील वणी-खुर्द येथे जादूटोण्याच्या संशयावरुन सात जणांना मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरुन मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ :

जादूटोण्याच्या संशयावरून आधीही वृद्धांना मारहाण

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध आणि महिलांना मारहाणीचा प्रकार अवघ्या दहा दिवसांपूर्वीच समोर  आला होता. तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द या गावात ही घटना घडली होती. गावात भानामती करत असल्याच्या संशयावरून चार महिला आणि तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली होती. गावातील नागरिक मारहाणीत सहभागी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं.

साहेबराव उके 48, शिवराज कांबळे 74 ,एकनाथ उके 70, शांताबाई कांबळे 53, धम्माशीला उके 38 पंचफुला उके 55, प्रयागबाई उके 64 अशी पीडितांची नावे आहेत.

अंनिसच्या माध्यमातून गावाचे प्रबोधन

पीडित सात पैकी पाच व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत पीडितांची सोडवणूक केली होती. पोलिसांनी बारा व्यक्तींविरोधात सुरुवातीला गुन्हे दाखल केले होते. अंनिसच्या माध्यमातून गावाचे प्रबोधन करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO : जादूटोण्याचा संशय, सत्तरी ओलांडलेल्या वृद्धांसह 7 जणांना खांबाला बांधून मारहाण

बाभळीवर खिळे ठोकले, लिंबू,काळ्या बाहुल्या लटकवल्या; नाशिकमध्ये जादूटोण्याच्या प्रकारामुळे घबराट

पैशाचा पाऊस पाडून 80 कोटी, आमिषाला महिला भुलली, मांत्रिकाकडून मुलीचा शारीरिक छळ

फ्लॅट नावावर करुन घेण्यासाठी पोटच्या मुलांकडून मारहाण, पुण्यात 58 वर्षीय महिलेची पोलिसात तक्रार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.