परिवहन अधिकाऱ्याकडे 50 हजारांच्या खंडणीचा तगादा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी
कामाचे उगाच मोबाईल चित्रीकरण करून अधिकाऱ्यांना बदनाम करत साखरे जाहीर फलक लावण्याच धमकी द्यायचा. सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी या प्रकाराची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली.
चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खंडणीखोर पदाधिकारी उजेडात आला आहे. राष्ट्रवादीचा चंद्रपूर शहर सचिव नयन साखरे याने चंद्रपूरच्या परिवहन अधिकाऱ्याकडे 50 हजार रुपयांची खंडणी देण्याचा तगादा लावल्याचा आरोप आहे. त्यासाठी तो रोज परिवहन अधिकारी यांच्या कक्षात येऊन दैनंदिन कामात अडथळे आणत असल्याचाही दावा केला जातो. त्यानंतर राष्ट्रवादीने त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
काय आहे प्रकरण?
कामाचे उगाच मोबाईल चित्रीकरण करून अधिकाऱ्यांना बदनाम करत साखरे जाहीर फलक लावण्याच धमकी द्यायचा. सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी या प्रकाराची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. पोलिसांनी तक्रारीतील सत्यता तपासून विशेष पथक बनवून जाळ्यात अडकवले. शेवटी तडजोडअंती 35 हजार रुपये स्वीकारताना परिवहन कार्यालयात सापळा यशस्वी केला गेला.
राष्ट्रवादीतून हकालपट्टी
राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने नयन साखरे याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या घडामोडीनंतर स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांनी विविध कार्यालयांना एक पत्रक जारी केले आहे. यात पदाधिकारी खंडणी मागत असल्यास संपर्क प्रमुखांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात ब्लॅकमेलर तरुणीला बेड्या
दोनच दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत दोन लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह तिघांना गुन्हे शाखेच्या युनिटने रंगेहाथ पकडले होते. याबाबत पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे (वय 56, रा. पिंपळे निलख) यांनी लष्कर पोलिसात तक्रार दिली होती. नेहा आयुब पठाण (वय 25 ,कात्रज) मेहबुब आयुब पठाण (वय 52) आणि आयुब बशीर पठाण (वय 55, दोघेही रा. अकलुज, ता. माळशिरस) यांना अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह तिघांना अटक
Couple Attacked | घराचं दार तोडून झोपलेल्या दाम्पत्यावर सपासप वार, नालासोपाऱ्यात खळबळ
Badlapur | भांडणात मध्यस्थी केल्याचा राग, बारमध्येच तरुणावर कोयत्याने हल्ला