गर्लफ्रेण्डच्या नवऱ्याला दारु पाजली, नंतर वर्धा नदीत फेकलं, अपघात भासणाऱ्या हत्येचं गूढ कसं उकललं?

मयत रामेश्वर निषाद याची पत्नी सुमनचे शेजारी राहणाऱ्या सुरज सोनकर यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. रामेश्वरला या प्रकरणाची कुणकुण लागली. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. आपल्या बायकोपासून दूर राहण्यासाठी रामेश्वरने सुरजला समज दिली.

गर्लफ्रेण्डच्या नवऱ्याला दारु पाजली, नंतर वर्धा नदीत फेकलं, अपघात भासणाऱ्या हत्येचं गूढ कसं उकललं?
प्रियकराच्या साथीने पत्नीकडून पतीची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 8:00 AM

चंद्रपूर : महिलेने प्रियकराच्या साथीने आपल्या पतीची हत्या (Husband Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. अनैतिक संबंधात (Extra Marital Affair) पतीचा अडथळा ठरत असल्याने महिलेने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचा आरोप आहे. तरुणाला नदीत बुडवून दोघांनी त्याचा जीव घेतला, त्यानंतर ही हत्या अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. एक तरुण दुचाकीसह पुलावरुन वर्धा नदीत कोसळल्याची माहिती गुरुवारी रात्री पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बचावकार्य करत बाईक नदीतून बाहेर काढली. नदीतील पाण्याला जोरदार प्रवाह असल्यामुळे तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पोलिसांना सापडला. सुरुवातीला हा अपघात असल्याचं पोलिसांनी मानलं होतं, मात्र तपासादरम्यान चकित करणारी माहिती समोर आली.

काय आहे प्रकरण?

मयत रामेश्वर निषाद याची पत्नी सुमनचे शेजारी राहणाऱ्या सुरज सोनकर यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. रामेश्वरला या प्रकरणाची कुणकुण लागली. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. आपल्या बायकोपासून दूर राहण्यासाठी रामेश्वरने सुरजला समज दिली. रामेश्वर आपल्या रस्त्यात काटा ठरत असल्याचं पाहून सुमन आणि सुरज यांनी त्याच्या हत्येचा कट रचला.

नेमकं काय घडलं?

सुरजने हत्येसाठी अभिजीत पांडे नावाच्या मित्राला 15 हजार रुपयांची सुपारी दिली होती. हत्येसाठी गेल्या महिनाभरापासून प्रयत्न सुरु होते. सुरज एके दिवशी रामेश्वरला हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने घेऊन गेला. शहराबाहेरील एका ढाब्यावर त्यांनी मनसोक्त मद्यपान केलं. परत येताना सुरज आणि त्याच्या साथीदाराने रामेश्वरला वर्धा नदीत फेकलं. त्यानंतर त्याची दुचाकीही पुलावरुन खाली फेकली.

पत्नीच्या प्रियकरानेच पोलिसांना कळवलं

घटनेनंतर सुरजनेच पोलिसांना याविषयी माहिती दिली. आम्ही दुचाकीने परत येत असताना वर्धा नदीवरील पुलावर समोरुन एक गाडी आली. त्यामुळे रामेश्वरचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि तो बाईकसह नदीत पडला. तर आपण पुलावरच पडल्यामुळे वाचलो, असं सुरजने सांगितलं.

सीसीटीव्ही फूटेजमुळे संशय बळावला

पोलिसांनी सुरुवातीला हा अपघात असल्याचा समज केला. मात्र तपासादरम्यान त्यांनी मद्यपान केलेल्या सीसीटीव्हीवरील फूटेज तपासलं, तेव्हा पोलिसांना संशय आला. सुरज सारखा फोनवर बोलत होता, बाहेर ये-जा करत होता. पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स तपासले असता त्यांना खात्री झाली. पोलिसांनी कसून चौकशी करताच सुरजने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी हत्येनंतर अवघ्या 48 तासात या प्रकरणाचं गूढ उकललं. हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी रामेश्वरची पत्नी सुमन, तिचा प्रियकर सुरज आणि साथीदार अभिजीत यांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात त्रिकोणी कुटुंबाचा दुःखद अंत, पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने आयुष्य संपवलं

जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला, दोघांचा मृत्यू, बारा वर्षांनी आरोपीला शिक्षा

लग्नाचं प्रपोजल नाकारल्याचा राग, भरबाजारात तरुणीवर हल्ला, बघ्यांमुळे जीव गमावला

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.