Gondia Suicide | आई बाहेरगावी, वडील जंगलात, 21 वर्षीय तरुणाची घरात आत्महत्या

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मोहगाव येथे 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. भूपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक याने राहत्या घरी पाटणवर जाऊन गळफास घेतल्याची माहिती आहे.

Gondia Suicide | आई बाहेरगावी, वडील जंगलात, 21 वर्षीय तरुणाची घरात आत्महत्या
गोंदियात युवकाची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 9:42 AM

गोंदिया : 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मोहगाव येथे हा प्रकार उघडकीस आला. भूपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक असं मयत तरुणाचं नाव आहे. त्याने आपल्या राहत्या घरी पाटणवर जाऊन गळफास घेत आयुष्याची अखेर केली. तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण?

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मोहगाव येथे 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. भूपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक याने राहत्या घरी पाटणवर जाऊन गळफास घेतल्याची माहिती आहे.

आई बाहेरगावी, वडील जंगलात

भूपेंद्रची आई आणि बहीण बाहेर गावी गेल्या होत्या. वडील हे गायी म्हशी चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते, त्यावेळी घरी कुणीच नव्हते. घरी कोणी नसल्याची संधी साधून भूपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक याने गळफास घेतल्याचा आरोप आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

दरम्यान, भूपेंद्रच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या घटनेची तक्रार मृतकाचे वडील दुर्गाप्रसाद यांनी आमगाव पोलीस स्टेशनला दिली. आमगाव पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

Vainganga River | ‘जीवनदायिनी’ वैनगंगा ठरतेय ‘मृत्यूवाहिनी’, दीड वर्षांत नदीत 17 आत्महत्या

दिग्दर्शक गिरीश मलिकांच्या मुलाच्या मृत्यूचं गूढ उकललं, आत्महत्येचं कारणही स्पष्ट

सोलापुरात  सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने उचलेले टोकाचे पाऊल

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.