Nagpur Murders | फेब्रुवारीत शून्य हत्या, नागपूर पोलिसांनी पाठ थोपटली, मार्चमध्ये दहा हत्याकांड
फेब्रुवारी महिन्यात गुन्हेगारांना वेसण घालण्यात नागपूर पोलिसांना यश मिळाले होते, मात्र कौटुंबिक वादातून घडणाऱ्या घटनांनी मार्च महिन्यात रेकॉर्ड केला. जानेवारीमध्ये नागपुरात एकूण 4 हत्येच्या घटना घडल्या होत्या, त्यानंतर फेब्रुवारी मध्ये एकही हत्या झाली नव्हती,
नागपूर : शून्य हत्या झालेला महिना म्हणून फेब्रुवारीमध्ये नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) स्वतःची पाठ थोपटून घेतली होती, मात्र मार्च महिन्यात एका मागून एक खुनाच्या घटना घडल्या. त्यामुळे नागपूर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह लागलं आहे. फेब्रुवारीचा बॅकलॉग एकट्या मार्च महिन्यात भरुन निघाला आहे. मार्च महिन्यात शहराच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 10 खुनाच्या घटना (Nagpur Murders) घडल्या आहेत. मार्च महिन्यात 10 हत्याकांड घडली असली, तरी त्यापैकी 6 ते 7 हत्या या नातेसंबंधातील व्यक्तींनी केल्या असल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
कुठल्या महिन्यात किती हत्या?
फेब्रुवारी महिन्यात गुन्हेगारांना वेसण घालण्यात नागपूर पोलिसांना यश मिळाले होते, मात्र कौटुंबिक वादातून घडणाऱ्या घटनांनी मार्च महिन्यात रेकॉर्ड केला. जानेवारीमध्ये नागपुरात एकूण 4 हत्येच्या घटना घडल्या होत्या, त्यानंतर फेब्रुवारी मध्ये एकही हत्या झाली नव्हती, मात्र मार्च महिन्यात शहरात 10 हत्या झाल्या आहेत.
कौटुंबिक वादातून हत्याकांड
असे असले तरी बहुतांश हत्या कौटुंबिक वादातून घडल्या असल्याची माहिती अगदी सत्य आहे. आईने स्वतःच्या मुलाला संपवले, जावयाने मेहुण्याची हत्या केली, एका बापाने पत्नी आणि मुलीचा जीव घेतला अश्या प्रकारच्या घटना सर्वाधिक घडल्या आहेत. मात्र या घटना थांबवण्यासाठी काय उपाय योजना करता येईल, काही प्रबोधन केलं जाऊ शकते का याचा सुद्धा विचार पोलीस करत आहे
नागपूर पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठी मोहीम राबवली होती. त्याचा फायदाही झाला, अनेक कुख्यात गुन्हेगार जेलमध्ये आहेत, तर काहींनी शहर सोडलं मात्र या महिन्यात झालेल्या खुनाच्या घटना बघता कौटुंबिक कलह हे कारण दिसून येत असल्याने आता या घटना थांबवणे पोलिसांसमोर मोठं आव्हान ठाकलं आहे
संबंधित बातम्या :
Nagpur Crime | मार्च महिन्यात हत्येच्या घटनांनी हादरले नागपूर, मार्चमध्ये 9 खुनांच्या घटना
नागपूर मार्चमध्ये रक्ताने माखले, महिनाभरात खुनाच्या 9 घटना; नातेवाईक, मित्रांनीच केला घात
Nagpur Murder: 12 तासांत नागपुरात 2 तरुणांची हत्या, नात्यातील व्यक्ती का उठल्या जीवावर?