Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात सराईत गुन्हेगाराची हत्या, 450 रुपयांच्या उधारीतून जीव गमावला

काही दिवसांच्या पूर्वी काल्याने आरोपींकडून पैसे उसने घेतले होते. त्यातील 450 रुपये शिल्लक होते. त्यावरुन काल्या आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्याच वादातून धारदार शस्त्राने वार करत आरोपींनी काल्याची हत्या केली.

नागपुरात सराईत गुन्हेगाराची हत्या, 450 रुपयांच्या उधारीतून जीव गमावला
फक्त वीस रुपयांसाठी केला खून.
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 3:25 PM

नागपूर : नागपूरच्या पारडी भागात रविवारी झालेल्या काल्या डांगरेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. उधारीचे 450 रुपये परत न केल्याने गोट्या दुर्गुडे आणि पियुष पंचबुद्धे यांनी घरात घुसून त्याची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. मयत काल्या डांगरे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो पारडी परिसरात अवैध दारू विक्री करायचा.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांच्या पूर्वी काल्याने आरोपींकडून पैसे उसने घेतले होते. त्यातील 450 रुपये शिल्लक होते. त्यावरुन काल्या आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्याच वादातून धारदार शस्त्राने वार करत आरोपींनी काल्याची हत्या केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

अश्लील वर्तनाचा तिटकारा, नागपुरात सहकाऱ्याची हत्या

दरम्यान, गॅरेजमधील सहकारी मित्राच्या अश्लील वर्तनाला कंटाळून युवकाने त्याची हत्या केल्याची घटना नागपुरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. डोक्यावर टॉमीने वार करुन तरुणाचा खून करण्यात आला होता. राजू नागेश्‍वर असे मृताचे नाव होते. तर देवांश वाघाडे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बालाघाट येथे राहणारा राजू नागेश्‍वर हा कामाच्या निमित्ताने काही महिन्यांपूर्वी नागपुरात आला होता. आधी तो बांधकाम साईटवर काम करायचा. एका महिन्यापूर्वी तो दाभा ते गणेशनगर मार्गावर असलेल्या आशिष दुर्गे यांच्या गॅरेजमध्ये कामाला लागला. आरोपी देवांश वाघाडे हासुद्धा त्याच्यासोबत गॅरेजमध्येच काम करायचा. दोघेही गॅरेजमध्ये एकाच खोलीत राहायचे. राजू हा व्यसनाधीन होता. सोबतच त्याला मुलांसोबत अश्लील कृत्य करण्याचीही सवय होती

घटनेच्या रात्री काम झाल्यावर देवांश झोपला होता. तेव्हा राजूने पुन्हा त्याच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देवांशला चांगलाच राग आला. त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडणानंतर राजू तिथेच झोपला. पण, त्याच्या अश्लील कृत्यामुळे धास्तावलेल्या देवांशला मात्र झोप आली नाही. रागाच्या भरात त्याने लोखंडी टॉमीने राजूच्या डोक्यावर वार करुन त्याला एका फटक्यातच ठार केले. त्यानंतर त्याने राजूचा मृतदेह गॅरेजच्या मागील मैदानात फेकून दिला होता.

दारुच्या वादातून तरुणाची हत्या

दारुच्या गुत्त्यावर मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. नागपूरच्या एमआयडीसी परिसरातील राजीवनगर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ही घटना घडली होती. सुरेंद्र आनंद पीलघर याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश शाहु, अरुण जनमत सिंह आणि बबलू रामाधर स्लोडिया यांना अटक केली होती. मृत तरुण आणि आरोपी हे सर्व बांधकाम मजूर असून एकमेकांचे निकटवर्तीय परिचित होते. सर्व जण नियमितपणे एकत्र दारुही प्यायचे. त्यावरुनच झालेल्या वादावादीतून तरुणाची हत्या करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

गुरु-शिष्याचे बारा वर्ष प्रेमसंबंध, महिलेचे अन्यत्र सूत जुळले, नागपुरात शिष्याकडून हत्या

दारुच्या गुत्त्यावर किरकोळ वाद, नागपुरात तिघा मित्रांकडून तरुणाची हत्या

अश्लील वर्तनाचा तिटकारा, नागपुरात तरुणाकडून मित्राची हत्या

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.