पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून शारीरिक संबंध हे क्रौर्यच, नागपूर कोर्टाकडून घटस्फोट मंजूर
पत्नीची इच्छा नसताना तिचे हात-पाय बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हे क्रौर्यच आहे, असा निर्वाळा देत नागपूर कौटुंबिक न्यायालयाने विवाहितेच्या घटस्फोट अर्जाला दिली संमती दिली आहे.
नागपूर : पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे, हे क्रौर्यच आहे, असा निर्वाळा नागपुरातील कोर्टाने (Nagpur Court) दिला आहे. विवाहितेच्या घटस्फोट (Divorce) अर्जाला न्यायालयाने संमती दिली. 22 वर्षीय विवाहितेने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पतीला दारुचे व्यसन असून सेक्स करण्यास नकार दिल्यावर तो बळजबरी करायचा, असा आरोप पीडितेने केला होता. हात-पाय बांधून नवरा आपल्याला शारीरिक संबंध (Physical Assault) ठेवायला भाग पाडायचा, तसेच आरडाओरडा करु नये, म्हणून तोंडात कापडाचा बोळाही कोंबायचा, असा दावा पीडित तरुणीने अर्जात केला होता. त्यानंतर विवाहितेच्या घटस्फोट अर्जाला संमती देत न्यायालयाने तिला दिलासा दिला आहे.
काय आहे प्रकरण?
पत्नीची इच्छा नसताना तिचे हात-पाय बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हे क्रौर्यच आहे, असा निर्वाळा देत नागपूर कौटुंबिक न्यायालयाने विवाहितेच्या घटस्फोट अर्जाला दिली संमती दिली आहे.
22 वर्षीय तरुणीचा घटस्फोटासाठी अर्ज
नागपुरातील वाडी परिसरातील हे दाम्पत्य असून, या प्रकरणातील 22 वर्षीय तरुणीने पतीपासून घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या दाम्पत्याचा 2017 मध्ये विवाह झाला. पतीला दारूचे व्यसन होते. यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत असत.
शारीरिक संबंधांसाठी पतीचे क्रौर्य
पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर पती तिच्यावर बळजबरी करायचा. पती तिचे हात-पाय बांधून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असे. तिने आरडाओरड करू नये, यासाठी तो तिच्या तोंडात कापडाचा बोळा घालत असल्याचाही आरोप आहे.
वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यावर, पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे, हे क्रौर्यच आहे, असा निर्वाळा नागपुरातील कौटुंबिक न्यायालयाने दिला. कोर्टाने विवाहितेच्या घटस्फोट अर्जाला संमती देत तिला मोठा दिलासा दिला आहे.
संबंधित बातम्या :
पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याशिवाय दुसरी बायको पेन्शनसाठी पात्र नाही, हायकोर्टाचा निर्णय
सावधान! लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी, होऊ शकतो घटस्फोट, का ते वाचा
माझी बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या, नवरा थेट पोलिसात; बायकोने सांगितलं चक्रावणारं कारण