VIDEO | शस्त्राच्या धाकाने तोडफोड करत लूट, नागपुरात भरदिवसा दोन गुंडांचा हैदोस
हातात शस्त्र घेऊन दोन गुंड एका बाईकवरून आले. त्यांनी हॅपी फूड नावाच्या दुकानावर पहिला हल्ला चढवला. त्यात त्यांनी नागरिक आणि दुकानदाराला धमकावत रक्कम लुटली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
नागपूर : नागपूरच्या गजबजलेल्या माणेवाडा परिसरात दोन गुंडांनी भर दिवसा हैदोस घातला. शस्त्राचा धाक दाखवत तीन ठिकाणी तोडफोड करुन गुंडांनी लूटमार केल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी दोन्ही गुंडांच्या मुसक्या आवळल्या असून हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
नेमकं काय घडलं?
हातात शस्त्र घेऊन दोन गुंड एका बाईकवरून आले. त्यांनी हॅपी फूड नावाच्या दुकानावर पहिला हल्ला चढवला. त्यात त्यांनी नागरिक आणि दुकानदाराला धमकावत रक्कम लुटली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे गुंडांचा शोध
त्यानंतर गुंडांनी एका पेट्रोल पंपावर हल्ला बोल केला, मात्र तिथे त्यांना लूट करता आली. पुढे एका तंदूर सावजी नावाच्या दुकानात ते पोहोचले आणि तिथेही त्यांनी हंगामा केला आणि पळून गेले. याची माहिती मिळताच तिन्ही ठिकाणी पोलीस पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फूटेजचा आधार घेत या गुंडांचा शोध सुरु केला.
दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार
काही वेळातच आरोपी शुभम फुलझेले, शिवम चौधरी यांना बेड्या ठोकण्यात आल्या. हे दोन्ही आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून दहशत पसरवण्याच्या उद्देशाने यांनी हा प्रकार केला असावा, असा प्राथमिक अंदाज नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही एम चौधरी यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.
नागरिकांमध्ये संताप
या गुंडांना आपली दहशत परिसरात पसरवायची आहे. भर दिवसा गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा धाक राहिला नाही का असे प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहे
पाहा व्हिडीओ :
शस्त्राच्या धाकाने तोडफोड करत लूट, नागपुरात भरदिवसा दोन गुंडांचा हैदोस #Nagpur #Crime pic.twitter.com/s2QKgVnQaY
— Anish Bendre (@BendreAnish) September 5, 2021
दरम्यान, बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण गुंडांचा हातात तलवारी नाचवण्याचा प्रकार बघितला आहे. आपण अनेक चित्रपटांमध्ये एखादी टोळी हातात तलवार किंवा कोयता घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करताना बघितलं आहे. पण पुण्यात वास्तवात या अशा सिनेस्टाईल दहशत माजवण्याचे प्रकार सर्रासपणे घडताना दिसत आहेत. पुण्याच्या सय्यदनगर परिसरात एका टोळीने तर सर्वच हद्द पार केल्या आहेत. त्यांच्या थैमानाचा पूर्ण प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. गुंडांचा हैदोस माजवतानाचे क्षण सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे या गुंडांना पोलिसांचा काहीच धाक नाही हे त्यांच्या कृत्यातून स्पष्टपणे दिसत आहेत.
संबंधित बातम्या :
नागपुरातील तडीपार गुंडाकडे अडीच किलो गांजा, तस्करी प्रकरणात बेड्या
खंडणीचा हप्ता देण्यास नकार, चाकणमध्ये कोयत्याने वार करत तरुणाचे सोन्याचे दागिने लुटले